adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शासन निर्देशानुसार दिव्यांगांना चोपडा नगरपरिषदेमार्फत आर्थिक सहाय्य

 शासन निर्देशानुसार दिव्यांगांना चोपडा नगरपरिषदेमार्फत आर्थिक सहाय्य  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा: आज दि. 24/03/2026 ...

 शासन निर्देशानुसार दिव्यांगांना चोपडा नगरपरिषदेमार्फत आर्थिक सहाय्य 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा: आज दि. 24/03/2026 रोजी चोपडा नगरपरिषदेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी शासन निर्देशानुसार आर्थिक सहाय्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील व मुख्याधिकारी श्री. रामनिवास झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. 

या उपक्रमांतर्गत शहरातील एकूण ५२० दिव्यांग लाभार्थ्यांना एकूण रु. 17,29,500/- इतक्या रकमेचे धनादेश वितरित करण्यात आले. सदर धनादेश दिव्यांग प्रतिनिधी म्हणून सौ. अर्चना राजेंद्र पाटील (महाराष्ट्र राज्य प्रादेशिक महिला अध्यक्ष व नियुक्ती प्रमुख, रुद्र अपंग संघटना, वाशिम) यांनी स्विकारला.

तसेच, जागतिक महिला दिनानिमित्त बचत गटातील CRP महिला तसेच नगरपरिषदेमधील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना साडी वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक प्रशासन व सामान्य प्रशासन विभागाच्या सहकार्याने करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान मा. नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील, उपनगराध्यक्ष श्री. पंकज (भैय्यासाहेब) बोरोले तसेच सन्माननीय नगरसेवक श्री. किशोर चौधरी, श्री.रमाकांत ठाकुर, श्री तिलक शहा, श्री. अमोल पाटील, सौ. वंदना बाविस्कर, श्री. प्रवीण देशमुख, श्री. दिपक पाटील, श्री.शे.हनिफ आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील यांनी दिव्यांग बांधवांच्या अडचणी समजून घेत त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. मुख्याधिकारी श्री. रामनिवास झंवर यांनी समाजातील प्रत्येक घटकाने दिव्यांग व्यक्तींना सहकार्य करून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली.

या कार्यक्रमास नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने दिव्यांग नागरिक उपस्थित होते. या उपक्रमामुळे दिव्यांग सक्षमीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

No comments