प्राथमिक आरोग्य केंद्र अडावद येथे HPV लसीकरण शुभारंभ व जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद. चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दि. 24/03/...
प्राथमिक आरोग्य केंद्र अडावद येथे HPV लसीकरण शुभारंभ व जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दि. 24/03/2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, अडावद येथे केंद्र व राज्य शासनाने सुरू केलेल्या HPV (गर्भाशयमुख कॅन्सर विरोधी लस) लसीकरणाचा शुभारंभ अडावद येथील सन्माननीय सरपंच श्री बबनखा तडवी यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ गिरीश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन सुशिर व डॉ. अर्चना पाटील यांनी HPV लसीकरणाचे महत्व पटवून दिले. गर्भाशयाचा कॅन्सर (cervical Cancer)हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक होणारा कॅन्सरचा प्रकार असून यामध्ये दरवर्षी हजारो महिला कॅन्सरमुळे मृत्यूमुखी पडत आहे. त्यामुळे cervical कॅन्सरला वेळीच आळा घालण्यासाठी 14 ते 15 वर्ष वयोगटातील ( ज्या मुलींनी 14 वा वाढदिवस साजरा केलेला आहे परंतु 15 वा वाढदिवस साजरा केलेला नाही)
अशा वयोगटातील मुलींचे पालकांनी त्वरित लसीकरण करून घ्यावे. ही लस पूर्णतः सुरक्षित असून जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य असलेल्या 142 देशांनी ही लस आपल्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट केलेली आहे. ही लस प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 4000 पासून ते 6000 रुपयांपर्यंत दिली जात आहे. त्यामुळे शासनाने मोफत दिलेल्या HPV लसीचे डोस मर्यादित उपलब्ध असल्याने त्वरित आपल्या पाल्यांचे HPV लसीकरण करून भविष्यात होणाऱ्या गर्भाशयाच्या कॅन्सर पासून धोका टाळता येईल. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
या कार्यक्रमाप्रसंगी कृ. उ. बा. समितीचे माजी सभापती श्री दिनकरराव देशमुख, उपसरपंच श्री पंकज महाजन, ग्रामसेवक श्री. प्रमोद सैंदाणे, ग्रामपंचायत सदस्य श्री सचिन महाजन, श्री मनोहर पाटील, श्री हरीश पाटील, श्री हनुमान महाजन, शकीलोद्दीन शेख, रफिक मनियार, अमोल कासार व इतर ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.


No comments