adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्वीकृत सदस्यपदात पत्रकारांना स्थान द्यावे — मच्छिंद्र कोळी यांची मागणी

 स्वीकृत सदस्यपदात पत्रकारांना स्थान द्यावे — मच्छिंद्र कोळी यांची मागणी   राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वीकृत सदस्य पदासाठी...

 स्वीकृत सदस्यपदात पत्रकारांना स्थान द्यावे — मच्छिंद्र कोळी यांची मागणी  


राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वीकृत सदस्य पदासाठी विविध क्षेत्रांतील व्यक्तींना संधी देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून या निर्णयात पत्रकारांनाही स्थान मिळणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार  मच्छिंद्र कोळी यांनी केली आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (दुसरी सुधारणा) विधेयक १७ मार्च २०२६ रोजी विधानसभेत एकमताने मंजूर झाले. या निर्णयामुळे महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये विविध क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळणार आहे. सामाजिक कार्याला चालना देणारे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे असल्याचे कोळी यांनी नमूद केले.

कोळी पुढे म्हणाले की, समाजातील अनेक व्यक्ती निःस्वार्थ भावनेने कार्य करत असतात. पत्रकार, लेखक, साहित्यिक, डॉक्टर, वकील, कलाकार, चार्टर्ड अकाउंटंट, निवृत्त शिक्षक, पर्यावरणप्रेमी, तसेच माजी सैनिक व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यांचे योगदान मोलाचे असते. मात्र त्यांच्या कार्याला अपेक्षित व्यासपीठ अनेकदा मिळत नाही. अशा व्यक्तींना स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात गुणवत्ता आणि पारदर्शकता वाढेल.

विशेषतः पत्रकार हा लोकशाहीचा ‘चौथा स्तंभ’ मानला जातो. पत्रकारांचे कार्य गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विस्तारलेले असते. समाजातील प्रश्न मांडणे, प्रशासनावर लक्ष ठेवणे आणि जनतेचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे प्रमुख कार्य आहे. त्यामुळे पत्रकारांना स्वीकृत सदस्य म्हणून स्थान दिल्यास स्थानिक प्रशासन अधिक जबाबदार, पारदर्शक आणि लोकाभिमुख होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्याच्या विकासासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारांसह विविध क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना समान संधी देणे गरजेचे आहे. शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून पत्रकारांना स्वीकृत सदस्य पदाचा मान द्यावा, अशी अपेक्षा मच्छिंद्र कोळी यांनी व्यक्त केली.

No comments