राज्य महिला आयोग सौ. रूपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा; भोंदू बाबा अशोक खरातांना साथ देणे भोवले ! सौ. अनुजा कारखेले-देवरे ( मुंबई ) (संपाद...
राज्य महिला आयोग सौ. रूपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा; भोंदू बाबा अशोक खरातांना साथ देणे भोवले !
सौ. अनुजा कारखेले-देवरे ( मुंबई )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नाशिक भोंदू बाबा अशोक खरात या प्रकरणात आरोप होत असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा अखेर राज्यांच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांच्याकडे (दि. 20) मार्च रोजी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडवणीस यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी वैयक्तिक व स्वेच्छणे राजीनामा सोपवत आहे असे नमूद केले आहे.15 ऑक्टोंबर 2024 रोजी त्यांची राज्य महिला अध्यक्ष या पदावर नियुक्ती झाली होती. दरम्यान नाशिक भोंदू बाबा अशोक खरात अश्लिल कारनामे उघड होत आहेत. तसेच अनेक चित्रफीतीही समोर येत आहेत अशातच चाकणकरांन या खरातांच्या भक्त होत्या. अनेक महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अशोक खरात यांना अटक झालेल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा या भक्तच असल्यामुळे स्तरांतून यांच्यावर टीका होत होती. त्यामुळे त्यांच्यावर दबाव वाढला होता. या प्रकरणात अशोक खरात याला अटक झाल्यानंतर राज्यांतील वातावरणही चांगलेच तापले होते. विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षावर टीकेचा भडिमार सुरू केला होता. त्यातच चाकणकरांच्या खरात यांचा अनुयायी असल्याचे अनेक फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्याच राष्ट्रवादी अजित पवार गटाची पक्षाची प्रतिमा मलिन होत होती. त्यातूनच त्यांच्यावर राजीनामाचा दबाव चांगलाच वाढला होता. अखेर रूपाली चाकणकरांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांच्याकडे संपविला आहे.

No comments