adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खडसे महाविद्यालयाच्या भाग्यश्री सोनीची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी निवड

 खडसे महाविद्यालयाच्या भाग्यश्री सोनीची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी निवड  प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत...

 खडसे महाविद्यालयाच्या भाग्यश्री सोनीची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी निवड 


प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

  मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील विद्यार्थिनी कु. भाग्यश्री कृष्णा सोनी हिची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे.

फ्री स्टाईल कुस्ती प्रकारातील ७२ किलो वजन गटात तिची निवड करण्यात आली आहे. सदर स्पर्धा १७ ते २० मार्च २०२६ दरम्यान कुरुक्षेत्र विद्यापीठ, कुरुक्षेत्र (हरियाणा) येथे होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यापीठाचा संघ १४ मार्च रोजी रवाना झाला आहे.

भाग्यश्री सोनी हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयातर्फे प्राचार्य प्रा. डॉ. एच. ए. महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करत अभिनंदन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे, उपप्राचार्य डॉ. वंदना चौधरी, क्रीडा संचालक डॉ. प्रतिभा ढाके, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक बावस्कर तसेच अश्विन सुरवाडे उपस्थित होते.

भाग्यश्रीच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे-खेवलकर, उपाध्यक्ष नारायण चौधरी, सचिव डॉ. सी. एस. चौधरी, व्यवस्थापन मंडळ, प्राध्यापकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले.

भाग्यश्री सोनी हिला महाविद्यालयाच्या क्रीडा विभागासह वरणगाव येथील हनुमान व्यायामशाळेचे नामदेव वस्ताद, संजय बावस्कर, प्रणय बावस्कर व अजय तायडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

No comments