adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ‘ब्लॅकमेल’.. महिलेला धमकावून वर्षानुवर्षे अत्याचार..! तरुणावर गुन्हा दाखल

  प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ‘ब्लॅकमेल’.. महिलेला धमकावून वर्षानुवर्षे अत्याचार..! तरुणावर गुन्हा दाखल  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेम...

 प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ‘ब्लॅकमेल’.. महिलेला धमकावून वर्षानुवर्षे अत्याचार..! तरुणावर गुन्हा दाखल 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-  प्रेमाचे आमिष दाखवून एका पोलिस कर्मचारी महिलेला जाळ्यात ओढत तिचे खासगी फोटो व व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी एका तरुणा विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी हा गुन्हा अहिल्यानगर तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.रणजित मुकिंदा चव्हाण (रा. निमजेवाडी,घोटवी,ता. श्रीगोंदा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पीडित महिलेने रविवारी (८ मार्च) सायंकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणातील घटना मार्च २०१९ पासून २६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संशयित रणजित चव्हाण याने सुरुवातीला पीडित महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिच्याशी जवळीक वाढवत लग्नाचे आमिष दाखवले. या विश्वासाचा फायदा घेत त्याने पीडितेचे खासगी फोटो आणि व्हिडिओ काढले.पुढे ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच तिच्या कुटुंबीयांना दाखविण्याची धमकी देत पीडितेला मानसिक दबावाखाली ठेवले.या धमक्यांचा आधार घेत संशयिताने मार्च २०१९ पासून ते फेब्रुवारी २०२६ या प्रदीर्घ कालावधीत अहिल्यानगर-दौंड रस्त्यावरील बाबुर्डी बेंद (ता. अहिल्यानगर) शिवारातील एका हॉटेलमध्ये पीडितेच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

दीर्घकाळ सुरू असलेल्या या छळाला अखेर कंटाळून पीडित महिलेने धाडस करत रविवारी तोफखाना पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.पोलिसांनी तिची फिर्याद नोंदवून संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला.दरम्यान,ही घटना अहिल्यानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे निष्पन्न झाल्याने पुढील तपासासाठी हा गुन्हा अहिल्यानगर तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करत आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून महिलांना ब्लॅकमेल करून अत्याचार करणाऱ्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

No comments