adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपड्यात जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात

चोपड्यात जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:-  आज दिनांक 24 मार्च 20...

चोपड्यात जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा:-  आज दिनांक 24 मार्च 2026, मंगळवार रोजी जागतिक क्षयरोग (TB) दिनानिमित्त चोपडा तालुक्यात विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या आदेशानुसार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या निमित्ताने चोपडा तालुक्यातील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना क्षयरोगाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. क्षयरोग हा पूर्णपणे उपचाराने बरा होणारा आजार असून समाजात त्याबाबत जनजागृती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले. 

तालुका क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक किशोर सैंदाने यांनी विद्यार्थ्यांना क्षयरोगाची लक्षणे, प्रतिबंध व उपचार याविषयी माहिती दिली. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला येणे, भूक मंदावणे, वजन कमी होणे ही प्रमुख लक्षणे असून अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ शासकीय रुग्णालयात तपासणी करावी, असे आवाहन करण्यात आले. शासकीय रुग्णालयांमध्ये क्षयरोगाची मोफत तपासणी, औषधोपचार व मार्गदर्शन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली. या कार्यक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक विजय देशमुख, तालुका क्षयरोग समन्वयक राहुल सोनवणे यांनीही मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, प्राध्यापक डॉ. राहुल निकम, डॉ. उत्तम सोनकांबळे आणि सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्षयरोगाबाबत जागरूकता निर्माण होऊन समाजात जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला.

No comments