adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मालोद ग्रामपंचायतीत वाद : महिला सरपंचाच्या पतीकडून ग्रामविकास अधिकाऱ्याला शिवीगाळ ?

 मालोद ग्रामपंचायतीत वाद : महिला सरपंचाच्या पतीकडून ग्रामविकास अधिकाऱ्याला शिवीगाळ ? भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल:-  तालु...

 मालोद ग्रामपंचायतीत वाद : महिला सरपंचाच्या पतीकडून ग्रामविकास अधिकाऱ्याला शिवीगाळ ?

भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल:-  तालुक्यातील मालोद ग्रामपंचायतीत महिला सरपंचाच्या पतीकडून ग्रामविकास अधिकाऱ्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी विजय गंगाराम बारेला यांनी यावल पोलीस निरीक्षक तसेच पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

दि. २४ मार्च २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात तक्रारदार विजय बारेला यांनी नमूद केले की, ते मालोद ग्रामपंचायत कार्यालयात चार्ज हस्तांतरणासाठी गेले असता त्या ठिकाणी सरपंचांचे पती भारसिंग बारेला उपस्थित होते. यावेळी मागील ग्रामपंचायत अधिकारी विजय नारायण साळंके यांच्याकडून चार्ज परत देण्याची प्रक्रिया सुरू असताना भारसिंग बारेला यांनी कोणतेही कारण नसताना आक्षेप घेत शिवीगाळ केली.

तसेच “यापुढे मालोद किंवा वाघझिरा येथे आल्यास पाहून घेईन” अशी धमकी देत आईविषयीही अपमानास्पद शब्द वापरून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेवेळी ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई कुर्बान तडवी, रोजगार सेवक मेहरबान तडवी, सदस्य सुदरसिंग बारेला, सलीम तडवी, भिका तडवी, नजमा तडवी यांचे पती आमद तडवी तसेच ग्रामपंचायत अधिकारी विजय साळुंखे उपस्थित होते.

तक्रारदाराने पुढे म्हटले आहे की, यापूर्वीही भारसिंग बारेला यांनी अनेक वेळा शासकीय कामात अडथळा निर्माण करून त्रास दिला असून ग्रामपंचायतीचे कामकाज त्यांच्या सांगण्यानुसार करण्यासाठी दबाव टाकला जातो. तसेच सुरुवातीपासूनच काही सदस्यांना सोबत घेऊन वारंवार तक्रारी करून कार्यालयीन कामात अडथळे निर्माण करण्यात येत आहेत.

सध्या प्रशिक्षण कालावधीत असलेल्या तक्रारदार अधिकाऱ्याला मालोद येथेच काम करण्याचे आदेश असतानाही सततच्या त्रासामुळे येथे काम करणे कठीण झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे स्वतःची प्रतिनियुक्ती अथवा बदली अन्य ग्रामपंचायतीत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ही तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) तसेच विस्तार अधिकारी, पंचायत समिती यावल यांच्याकडेही पाठविण्यात आली असून पुढील कार्यवाहीकडे मालोद ग्रामपंचायत व किनगाव परिसराचे लक्ष लागले आहे.

No comments