ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्य,व सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे:- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर! सौ. शुभांगी सरोदे पुर...
ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्य,व सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे:- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर!
सौ. शुभांगी सरोदे पुरी गोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कामगारांसाठी आरोग्य, सुविधा मुलांना,शैक्षणिक सुविधा, कायदेविषयक सहाय्य पुरविण्यास त्यांच्या सुरक्षितेला प्राधान्य द्यावे असे निर्देश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकरांनी दिले आहेत. त्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होत्या... यावेळी रूपाली चाकणकर पुढे म्हणाल्या पश्चिम महाराष्ट्रांमध्ये मराठवाड्यातून येणाऱ्या महिला ऊसतोड कामगारांची संख्या अधिक आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निवासी शाळांची सुविधा उपलब्ध असावी. ऊसतोड महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती होणे आवश्यक आहे. मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याने बाल विवाहांचे प्रमाण आढळून येत आहे. त्यामुळे बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. तसेच महिलांचे प्रश्न व स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंधक कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत त्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडकवार कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे सचिव नंदिनी आवाडे उपसचिव डॉ.पद्मश्री बैनाडे उपस्थित होत्या. यांच्यासह सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे यासाठी महिला आयोग सदैव नेहमीच पाठीशी राहणार आहे. यावेळी पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

No comments