adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भव्य मेकअप सेमिनारमध्ये पूजा मनोज वायचोळ यांचा प्रथम क्रमांक!

 भव्य मेकअप सेमिनारमध्ये पूजा मनोज वायचोळ यांचा प्रथम क्रमांक!  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शेगाव:- शहरातील देशमुख मं...

 भव्य मेकअप सेमिनारमध्ये पूजा मनोज वायचोळ यांचा प्रथम क्रमांक! 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शेगाव:- शहरातील देशमुख मंगल कार्यालय येथे भव्य मेकअप व ब्यूटी सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन नागपूर येथील अपेक्षा सोनटक्के मॅडम यांनी केले होते.या सेमिनारमध्ये ब्रायडल मेकअप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे 50 ब्रायडल मेकअप आर्टिस्टांनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत शेगाव येथील सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट पूजा मनोज वायचोळ यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि मानाचा तुरा मिळवला.स्पर्धेत द्वितीय क्रमांक वैशाली याते (खामगाव) यांनी, तर तृतीय क्रमांक सृष्टि प्रशांत शर्मा (मलकापूर) यांनी मिळवला. तिन्ही विजेत्यांना मुंबईतील सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट अॅट्युरेन सर यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.पूजा वायचोळ या पुण्यातील सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट माधुरी खेस मॅडम यांच्या विद्यार्थीनी असून, आपल्या मेहनत, चिकाटी व कौशल्याच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शेगावच्या नावात भर पडली आहे.

No comments