adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला; पोलीस ठाण्याला मिळाला खमक्या अधिकारी!

 पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला; पोलीस ठाण्याला मिळाला खमक्या अधिकारी!  सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसा...

 पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला; पोलीस ठाण्याला मिळाला खमक्या अधिकारी! 


सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी ( कोल्हापूर जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक दर्जेच्या 12 तर सहाय्यक पोलीस निरीक्षक 14 तर एक पोलीस उपनिरीक्षक अशा 27 पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी आदेश जारी केले आहेत. यामध्ये शहापूर राधानगरी शाहूवाडी राजारामपुरी चंदगड हुपरी इस्पुर्ली जयसिंगपूर येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांची हुपरी पोलीस ठाण्यात बदली झाल्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांची नियुक्ती झाली आहे. पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या नियुक्तीमुळे पोलीस ठाण्याला खमक्या अधिकारी मिळाल्याचे बोलले जात आहे. गोरे यांनी पदभार घेताच प्रसारमाध्यमांनी यावेळी त्यांनी सांगितलं कायदा सुव्यवस्थेला प्रथमता: प्राधान्य देणार आहे. मात्र गोरे हे राधानगरी पोलीस ठाण्यात नेहमीच प्रयत्नशील राहिले, त्यांच्या बदलीमुळे राधानगरी तालुक्यांच्या परिसरांतील सर्वसामान्य जनताही चांगलीच भावनिक झाल्याचे दिसून येत आहे. त्यांनी आपल्या ठाम नेतृत्वाने, धाडसी निर्णयक्षमतेने आणि जनतेशी जिव्हाळ्याच्या नात्यांनी त्यांनी राधानगरीत कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला होता. त्यांची बदली झाल्याचे समजतात अनेकांनी व्हाट्सअप माध्यमातून साहेब आपली बदली रद्द करा असा देखील संदेश त्यांना मिळत होता. मात्र राधानगरी पोलीस ठाण्यात कालावधी पूर्णता:  झाल्यामुळे आणि राधानगरी पोलीस ठाण्यातील केलेल्या कामाची पोचपावती चांगलीच मिळाली आहे. पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी आता जयसिंगपूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे.

No comments