गारखेडा येथील वाघूर धरण बॅक वॉटरमधील द बँक वूड एम राल्ड रिसॉर्ड गारखेडा प्रकल्प,या कामाची दक्षता व गुणनियंत्रण विभागामार्फत सखोल चौकशी करण...
गारखेडा येथील वाघूर धरण बॅक वॉटरमधील द बँक वूड एम राल्ड रिसॉर्ड गारखेडा प्रकल्प,या कामाची दक्षता व गुणनियंत्रण विभागामार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश
नाशिक/जळगांव प्रतिनिधी
नाशिक : जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील वाघूर धरण बॅक वॉटर मधील द बँक वूड एम राल्ड रिसॉर्ड गारखेडा प्रकल्प या कामाबाबत प्राप्त तक्रारीची दखल घेत नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत.सदर कामाची गुणवत्ता व कार्यक्षमतेबाबत दक्षता व गुणनियंत्रण विभागामार्फत चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या संदर्भात पत्रकार तथा ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेना, जळगाव जिल्हाध्यक्ष हेमकांत बळीराम गायकवाड यांनी ११/०१/२०२६ रोजी ई-मेलद्वारे तक्रार अर्ज सादर केला होता. या तक्रारीत जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील वाघूर धरण बॅक वॉटर मधील द बँक वूड एम राल्ड रिसॉर्ड गारखेडा प्रकल्प या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
सदर तक्रार अर्ज विभागीय आयुक्त कार्यालय,नाशिक येथे प्राप्त झाल्यानंतर संबंधित विषय सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग,नाशिक यांच्याशी संबंधित असल्याने मुख्य अभियंत्यांना पत्र पाठवून तक्रारीतील मुद्द्यांचे परीक्षण करून नियमानुसार चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच या प्रकरणात दक्षता व गुणनियंत्रण विभागामार्फत कामाची सखोल तपासणी करून त्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी आणि केलेल्या कारवाईचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करावा, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या संदर्भातील आदेश तहसीलदार (सामान्य प्रशासन) पल्लवी भीमराव जगताप यांनी डिजिटल स्वाक्षरीद्वारे जारी केले असून या प्रकरणामुळे संबंधित कामाच्या गुणवत्तेबाबत प्रशासनिक स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.

No comments