adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अखेर कुख्यात 'बदाम गँग' एलसीबीच्या जाळ्यात..तब्बल १० गुन्हे उघड.. १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत यश

  अखेर कुख्यात 'बदाम गँग' एलसीबीच्या जाळ्यात..तब्बल १० गुन्हे उघड.. १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत यश   सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -...

 अखेर कुख्यात 'बदाम गँग' एलसीबीच्या जाळ्यात..तब्बल १० गुन्हे उघड.. १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत यश  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:- पाथर्डी तालुक्यातील चिंचपुर पांगुळ येथे मध्यरात्री घरात घुसून चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकणाऱ्या ‘बदाम गँग’ला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 48 तासांत जेरबंद करत मोठी कामगिरी बजावली आहे. या कारवाईत आरोपींकडून तब्बल 10 दरोडा, जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून 10,71,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

फिर्यादी दगडु भिमराज बडे (वय 47, रा. मळई वस्ती, चिंचपुर पांगुळ) हे दि. 18 मार्च 2026 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास पत्नीसमवेत घरात झोपलेले असताना अनोळखी 6 इसमांनी दरवाजा फोडून घरात प्रवेश केला. बेडरूममध्ये घुसून फिर्यादीच्या गळ्यावर चाकू ठेवत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून कपाटातील दागिने व रोख रक्कम असा 1,62,000 रुपयांचा ऐवज लुटून आरोपी फरार झाले.

या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गु.र. नं. 270/2026, भा.न्या.सं. कलम 310(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी विशेष पथक तयार केले. या पथकात सपोनि. हरिष भोये, पोउपनि. अनंत सालगुडे यांच्यासह सुरेश माळी, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, शाहिद शेख, शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे, प्रशांत राठोड, बाळासाहेब खेडकर, प्रकाश मांडगे, सागर ससाणे, महिला पोलीस अंमलदार वंदना मोढवे, चालक महादेव भांड, भगवान धुळे यांचा समावेश होता.

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मजले चिंचोली शिवारातील संजय आव्हाड यांच्या वस्तीवर सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. बदाम कडु काळे (वय 22, रा. शिरोडी ता. गंगापुर, जि. छत्रपती संभाजीनगर), साईनाथ विष्णु चव्हाण (वय 22, रा. मुडदे वडगाव, ता. गंगापुर), ऋतिक हसमुख चव्हाण (वय 20, रा. खोसपुरी, जि. अहिल्यानगर), महेश उर्फ उमेश नंदु काळे (वय 20, रा. खोसपुरी), भैय्या कडु काळे (वय 20, रा. शेकटा, ता. गंगापुर), लाकर करमत काळे (वय 26, रा. शेकटा, ता. गंगापुर) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

ताराचंद विरुपण भोसले (रा. गाजगाव), बोट्या उषा भोसले (रा. अंतापुर), तिरंगा कडु काळे (रा. शिरोडी) हे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

आरोपींकडून 69 ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत 10,25,000 रु.), 6 मोबाईल (46,000 रु.), चाकू, गलोर, लोखंडी कत्ती, कटावणी, भाला असा एकूण 10,71,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तपासादरम्यान आरोपींकडून शेवगाव, नेवासा, सोनई, राहुरी आदी ठिकाणचे एकूण 10 गुन्हे उघडकीस आले असून विविध कलमांखाली दाखल गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली आहे. मुख्य आरोपी बदाम कडु काळे व महेश नंदु काळे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

No comments