जिल्हा परिषद शाळा वडगावसीम येथे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:- तालुक्यातील वडगावसीम येथे...
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- तालुक्यातील वडगावसीम येथे शनिवार दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. जयश्री पंकज कोळी उपस्थित होत्या. तसेच श्री. समाधान भिवसन कोळी, श्री. दिपक रावसाहेब बाविस्कर यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते. सूत्रसंचालनाची जबाबदारी श्री. सुरेश सोनवणे सर यांनी समर्थपणे पार पाडली.
या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी मराठी, अहिराणी आणि हिंदी गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. लहानग्यांच्या निरागस सादरीकरणाला पालक व ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालकवर्ग व गावकरी उपस्थित राहिल्याने शाळेच्या उपक्रमाबद्दलचा उत्साह स्पष्टपणे दिसून आला. सत्कार समारंभाच्या वेळी तालुका पोलिस पाटील अध्यक्ष तथा गावचे पोलिस पाटील नंदलाल बाविस्कर यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका सौ. सपना दिनेश कोळी, सौ. कविता शशिकांत कोळी, श्री. सुरेश सोनवणे सर व श्री. रोहित निकम सर यांनी विशेष परिश्रम घेतले. केंद्रप्रमुख सौ. वैशालीताई प्रविण पाटील गोरगावले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम नियोजनबद्ध आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला. स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळाला असून त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.

No comments