रमजान विशेष उत्तमपणे जीवन जगण्याचा संदेश अल्लाहवर श्रद्धा ठेवतात, ते सर्व संकटांवर मात करतात. त्यांना त्यांचे फळ मिळतेच. अशा लोकांना ...
रमजान विशेष
उत्तमपणे जीवन जगण्याचा संदेश
अल्लाहवर श्रद्धा ठेवतात, ते सर्व संकटांवर मात करतात. त्यांना त्यांचे फळ मिळतेच. अशा लोकांना 'जन्नत(स्वर्ग) प्राप्त होते. जीवन जगताना व्यर्थ गोष्टींपासून नेहमी दूर राहा. त्यातून काहीच फायदा नाही. मनमिळाऊस्वभावातून माणसे जोडणे शिका. या जगात हेच महत्त्वाचे आहे.स्वार्थी वृत्ती आपणास व समाजास मारक आहे. आपण हीच सवय ठेवल्यास या जगात कोणीच आपल्याला ओळखणार नाही. अल्लाहलाही असे लोक आवडत नाहीत. आपल्या हातून चांगली कामे होतील, याकडे पाहावे. तुम्ही काय करता याचा सारा लेखाजोखा अल्लाहकडे आहे. म्हणून हे बांधवांनो, असत्याच्या मार्गापासून दूर राहा. एकमेकांचे प्रेम जिंका, भेदभावकरू नका. या, जगात सर्व समानआहेत. सर्व माझे बांधव आहेत, ही भावना वाढवा, तेव्हाच कळेल एकीचे फळ काय असते.
*जगण्याचे प्रशिक्षण*
रमाजानचा महिना आल्हाददायक महिना आहे. उपवास केल्याने थोडासा शारीरिक ताण पडल्याची जाणीव प्रत्येक उपवासधारकाला होतेच आणि अल्लाहला तेच अभिप्रेत आहे. स्वतः भूक आणि तहानेचा अनुभव न घेता, आपण इतरांच्या यातनेचा अनुभव नघेता आपण इतरांच्या यातनेचा अनुभव करू शकत नाही.रमजानचा महिना फक्त स्वत:करिता जगता, इतरांकरिता जगण्याचे प्रशिक्षण देतो आणि या सर्व शारीरिक यातना मनुष्य अल्लाहची प्रसन्नता प्राप्तीकरिता करत असल्यामुळे त्यात आध्यात्मिकताही समाविष्ट होते. रमजानचा मुख्य हेतू आध्यात्मिकतेची प्राप्ती आहे. आध्यात्मिकतेकरिता फार मोठे चिंतन, मनन किंवा द्रव्य लागत नाही. मानवाला आणि ईश्वराला खुश करणारी छोटी छोटी कामेसुद्धा आपणास मोठ्यांपेक्षा मोठे अध्यात्मवादी बनवू शकतात.
अब्दुल सरदार पटेल,
चोपडा, जि. जळगाव
मो. 8766747092

No comments