“रन फॉर अजित दादा” सदभावना रॅली संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:- आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री...
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी घटनेला आज दोन महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चोपडा शहरात “Run For Ajitdada” या सदभावना रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली आज दिनांक २८ मार्च रोजी सुनिल पाटील (वाळकी, चोपडा) यांच्या संकल्पनेतून उत्साहात पार पडली.
या सदभावना रॅलीत अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून अजितदादा पवार यांना अभिवादन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, आमदार कैलास पाटील, आमदार दिलीपराव सोनवणे, चोपडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन घनश्याम पाटील, चोपडा पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराती, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच नगरसेवक प्रवीण देशमुख, नरेंद्र पाटील, दिपक पाटील, अमोल पाटील, रानू दादा देशमुख, गोपाळराव सोनवणे जिल्हाध्यक्ष सा.न्याय विभाग,
लहुश धनगर, इम्रान बागवान, तालुकाध्यक्ष विजय पाटील, शशीकांत पाटील, राष्ट्रवादी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पाटील, युवती जिल्हाध्यक्ष मोनाली पवार, संजय कानडे, नोमान काझी, शाम परदेशी, प्रफुल्ल स्वामी, जमील कुरेशी, राकेश पाटील आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला.





No comments