फैजपूर येथे अल-खिजर सोसायटीतर्फे गरजूंना २९२ शीरखुर्मा किटचे वाटप इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर : पवित्र रमजान म...
फैजपूर येथे अल-खिजर सोसायटीतर्फे गरजूंना २९२ शीरखुर्मा किटचे वाटप
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर : पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर फैजपूर येथील अल-खिजर मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गोरगरीब व गरजू नागरिकांना शीरखुर्मा किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात महिलांचा सहभाग लक्षणीय प्रमाणात दिसून आला.
या किटचे वाटप सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शे. दानिश शे. निसार यांच्या पुढाकारातून करण्यात येते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष मुजम्मिल काजी, सचिव एजाज सर, अलताफ खान, सहसचिव अख्तर जनाब, रफिक जनाब, अयाज सर, शोएब शे., वसीम शे. तसेच इतर सदस्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
यावर्षी एकूण २९२ शीरखुर्मा किटचे वितरण करण्यात आले. यामध्ये विधवा, निराश्रित, गरजू व असहाय्य नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. समाजातील वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा सोसायटीचा हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही कौतुकास्पद ठरला.
यावेळी आयोजकांच्या वतीने अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली की, अल-खिजर सोसायटीला अधिकाधिक सेवा कार्य करण्याची शक्ती मिळो, जेणेकरून प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवता येईल.

No comments