adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चिमुकल्या मोहम्मदची मोठी झेप; चिनावलच्या ७ वर्षीय बालकाचे रमजानचे सर्व रोजे पूर्ण!

 चिमुकल्या मोहम्मदची मोठी झेप;  चिनावलच्या ७ वर्षीय बालकाचे रमजानचे सर्व रोजे पूर्ण!  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायकव...

 चिमुकल्या मोहम्मदची मोठी झेप; 

चिनावलच्या ७ वर्षीय बालकाचे रमजानचे सर्व रोजे पूर्ण! 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चिनावल येथील रहिवासी शेख अल्ताफ शेख मुंशी यांचा नातू आणि शेख अखलाक शेख अल्ताफ यांचा अवघ्या ७ वर्षांचा सुपुत्र शेख मोहम्मद अख्लाक शेख याने यंदाच्या पवित्र रमजान महिन्यात आपल्या अढळ जिद्दीचा परिचय देत संपूर्ण महिन्याचे सर्व रोजे अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता आणि वयाने लहान असूनही आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर या चिमुकल्याने दाखवलेला हा संयम खरोखरच कौतुकास्पद ठरला आहे. शेख मोहम्मदला त्याचे चुलते शेख अजमल, शेख अफजल, शेख अनिस आणि शेख यादेहक यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले असून, त्याच्या या धार्मिक धडाडीचे संपूर्ण परिसरातून अभिनंदन होत आहे. लहान वयातच कडक शिस्तीचे पालन करत त्याने पूर्ण केलेले हे रोजे त्याच्या जिद्दीचे प्रतीक मानले जात असून, चिनावल पंचक्रोशीत या बालकवीराच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

No comments