आमोदा येथे बौद्ध धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचे थाटात उद्घाटन फैजपूर ( इदू पिंजारी) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आमोदा येथील साकेत बुद्...
आमोदा येथे बौद्ध धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचे थाटात उद्घाटन
फैजपूर ( इदू पिंजारी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आमोदा येथील साकेत बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दहा दिवसीय बौद्ध धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन दि. २३ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडले. उद्घाटन कार्यक्रमात महाकारूणी तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून धूपदीप प्रज्वलित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेच्या महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा प्रियंका अहिरे, जिल्हा संघटक ए. टी. सुरडकर, जिल्हा संघटक वसुंधरा प्रवीण मेढे, यावल तालुका महिला अध्यक्षा मायाताई सुरेश तायडे व उपाध्यक्षा मिनाबाई उमेश बोदडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बौद्धाचार्य तथा केंद्रीय शिक्षक बी. डी. महाले यांनी सामुदायिक वंदना घेतली. उद्घाटनप्रसंगी बौद्धाचार्य पी. के. महाले, बौद्धाचार्य कौडिण्य मेश्राम, समाजसेवक राजू तायडे, एस. एम. तायडे सर, उमेश बोदडे, कामिनी तायडे मॅडम यांनी उपस्थित राहून शिबिरास शुभेच्छा दिल्या.
शिबिराच्या मार्गदर्शक प्रियंका अहिरे यांनी बुद्धांच्या शिकवणीवर आधारित प्रज्ञा, शील आणि करुणा या तत्त्वांवर तसेच बुद्ध, धम्म आणि संघ यांविषयी सखोल मार्गदर्शन केले. ए. टी. सुरडकर यांनी भारतीय बौद्ध महासभा विविध प्रकारची शिबिरे आयोजित करून धम्माचा प्रचार-प्रसार करत असल्याचे सांगितले. प्रत्येकाने धम्मकार्याला वेळ देऊन धम्माची गोडी वाढवावी आणि धम्म अधिक गतिमान करावा, असे त्यांनी आवाहन केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आमोदा येथील महिला मंडळातील मायाबाई बाबुराव तायडे, सगुनाबाई सुधाकर तायडे, अरुणा पंकज तायडे, रमाबाई वसंत भागेश्वर, मीनाक्षी मेढे, कमलाबाई प्रभाकर तायडे, सिंधू अशोक तायडे, छाया नवल तायडे, आम्रपाली तायडे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी यावल तालुका पुरुष विभाग अध्यक्ष बी. डी. महाले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments