मुलांच्या अध्यात्मिक विकासासाठी दि.2 मे ते 11 मे दरम्यान लासुर येथे मोफत वारकरी बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन....... लासुर प्रतिनिधी/ विश्र...
मुलांच्या अध्यात्मिक विकासासाठी दि.2 मे ते 11 मे दरम्यान लासुर येथे मोफत वारकरी बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन.......
लासुर प्रतिनिधी/ विश्राम तेले चौगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे मुलांमध्ये संस्कारांचे महत्त्व कमी होत असल्याची चिंता पालकांमधून व्यक्त केली जात असताना,श्री क्षेत्र लासूर ता.चोपडा येथे एक सकारात्मक आणि दिशादर्शक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.राष्ट्रीय कथाकार महंत प्रा हभप डॉ सुशिलजी महाराज विटनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलांसाठी सदगुरू संत तानाजी महाराज प्रासादिक निःशुल्क वारकरी बालसंस्कार शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर 02 मे ते 11 मे 2026 दरम्यान राहणार आहे.हे शिबीर समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ लासूर यांच्यावतीने आयोजित केले असून निवासी शिबिरामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येणार आहे.शिबिरात श्रीमदभगवदगीता,हरिपाठ,रामरक्षा, विष्णुसहस्रनाम,हनुमान चालीसा यांसारख्या धार्मिक ग्रंथांचे अध्ययन,तसेच पखवाज वादन, गायन,कीर्तन प्रशिक्षण,वारकरी पावल्या यांचे प्रात्यक्षिक शिक्षण
दिले जाणार आहे. यासोबतच योगासने व व्यक्तिमत्त्व विकास यांसारख्या आधुनिक गरजांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे.
तसेच दररोज दुपारी शिबिरातील विद्यार्थ्यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात येते व रात्री ठीक 8:30 ते 10:30 परंपरेशी निगळीत कीर्तनकरांचे कीर्तन आयोजित करण्यात येते
दि.2 रोजी हभप नरेश महाराज अंमळनेरकर,दि.3 हभप हरीश महाराज वडगावकर,दि.4 हभप बाळासाहेब महाराज अनवर्देकर,दि.5 हभप पवन महाराज लासुरकर,दि.6 हभप धीरज महाराज रुंधाटीकर,दि.7 हभप गौरव महाराज वाळकीकर,दि.8 हभप राहुल महाराज दोनगावकर,दि.9 हभप सोहम महाराज लासुरकर,दि.10 हभप राज महाराज कंचनपूर व दि.11 ला महंत प्रा हभप डॉ सुशिलजी महाराज विटनेकर यांच्या काल्याच्या व परंपरेच्या गुलालच्या कीर्तननाने शिबिराची सांगता होईल,
शिबिराच्या शेवटच्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे,या शिबिराचे दर वर्षी वेगवेगळ्या गावांना आयोजित करण्यात येते,या शिबिरात प्रवेशासाठी 5 वर्षांवरील मुलांना संधी देण्यात आली असून,वारकरी पोशाख बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच शिबिरादरम्यान मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली आहे,ज्यामुळे विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अध्यात्मिक व सांस्कृतिक शिक्षण घेता येईल. निवासी शिबिर असल्याने विद्यार्थ्यांनी आवश्यक साहित्य सोबत आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय कथा प्रवक्ते महंत प्रा हभप डॉ सुशिलजी महाराज विटनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सद्गुरू संत तानाजी महाराज प्रसादिक बालसंस्कार शिबिराचे अध्यापक व समस्त भजनी मंडळ,ग्रामस्थ लासूर यांचे योगदानही उल्लेखनीय आहे.
लासूर ता चोपडा येथील श्रीराम मंदिर येथे हे शिबिर पार पडणार असून,समाजात सुसंस्कारित आणि चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
दरवर्षी शिबिरात 200 विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षण दिले जाते व विशेष म्हणजे विद्यार्थी गावातून मधुकरी मागून त्याचे तेच भोजन केले जाते तरी पालकांनी आपल्या पाल्यांना या शिबिरात सहभागी करून घेऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचलावे असे आव्हाहन समस्त भजनी मंडळ व ग्रामस्थ लासुर यांच्या वतीने करण्यात येत आहे

No comments