०८ जून २०२६ पासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाचा इशारा जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुंबई — अन्याय, अत्याचार आणि भ्र...
०८ जून २०२६ पासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाचा इशारा
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुंबई — अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा अधिक तीव्र करण्यासाठी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ०८ जून २०२६ पासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वाढत्या भ्रष्टाचाराच्या घटनांविरोधात आवाज उठवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समितीच्या आवाहनानुसार, प्रत्येक जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील नागरिकांनी त्यांच्या भागातील तक्रारी अधिकृत लेटरपॅडवर संबंधित मंत्रालय, मुंबई येथील मंत्री व विभागीय सचिवांकडे पाठवाव्यात. या तक्रारींवर प्रशासनाने योग्य ती दखल न घेतल्यास संबंधितांनी ०८ जूनपासून सुरू होणाऱ्या उपोषणात प्रत्यक्ष सहभागी व्हावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी उपोषणामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या-आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहून राज्यभरातील विविध समस्या एकत्रितपणे मांडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. “संपूर्ण महाराष्ट्रातील विविध प्रश्न एकाच व्यासपीठावर मांडून न्याय मिळवण्यासाठी सामूहिक लढा उभारला जाईल,” असा निर्धार समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
या आंदोलनामुळे राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावा आणि प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
No comments