अहिल्यानगर हादरलं! AI च्या साहाय्याने अश्लील फोटो बनवून 'त्या' दुकानदाराची बदनामी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल सचिन मोकळं अहिल्यानग...
अहिल्यानगर हादरलं! AI च्या साहाय्याने अश्लील फोटो बनवून 'त्या' दुकानदाराची बदनामी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- तंत्रज्ञानाचा वापर प्रगतीसाठी व्हायला हवा,मात्र त्याचा वापर विकृत मानसिकतेतून केल्यास किती भयानक परिणाम होऊ शकतात, याचा प्रत्यय अहिल्यानगरमध्ये आला आहे.कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) गैरवापर करून एका प्रतिष्ठित दुकानदार आणि महिलेचे चारित्र्यहनन केल्या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नेवासा तालुक्यातील धक्कादायक प्रकार
नेवासा तालुक्यातील एका मोबाईल दुकानदाराने याप्रकरणी तक्रार दिली आहे.एका माथेफिरू इंस्टाग्राम खातेधारकाने फिर्यादीच्या पत्नीबद्दल अत्यंत घाणेरडा आणि अश्लील मजकूर सोशल मीडियावर पोस्ट केला होता.विकृती एवढ्यावरच थांबली नाही,तर आरोपीने फिर्यादी आणि गावातील एका दुसऱ्या महिलेचे फोटो एकत्र करून AI द्वारे ते आक्षेपार्ह स्वरूपात एडिट केले.हे बनावट फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर ठेवून समाजात त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.मार्च महिन्यापासून सुरू होता जाच हा मानसिक छळ मार्च २०२६ पासून सुरू होता. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे पीडित कुटुंब प्रचंड तणावाखाली होते.अखेर संयम सुटल्याने त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली.तक्रारीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ पावले उचलली,भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान (IT Act) कायद्यानुसार संबंधित इंस्टाग्राम खातेधारकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पथक आरोपीचा आयपी (IP) ॲड्रेस आणि लोकेशनचा शोध घेत आहे. सोशल मीडियावर आपले वैयक्तिक फोटो शेअर करताना प्रायव्हसी सेटिंग्जचा वापर करा. कोणाकडूनही असा त्रास होत असल्यास घाबरून न जाता तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा."सावधान रहा, सुरक्षित रहा! डिजिटल जगात तुमची एक छोटीशी चूक महागात पडू शकते. अशा गुन्हेगारांना अद्दल घडवण्यासाठी पोलीस प्रशासन आता सज्ज झाले आहे.

No comments