adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बाप-लेकाच्या नात्याला काळीमा..! मालमत्तेसाठी पोटच्या मुलाने बापावर सुभेदारावर केला जीवघेणा हल्ला.. 'मालमत्ता नावावर कर, नाहीतर जिवंत सोडणार नाही' दिली धमकी

 बाप-लेकाच्या नात्याला काळीमा..! मालमत्तेसाठी पोटच्या मुलाने बापावर सुभेदारावर केला जीवघेणा हल्ला.. 'मालमत्ता नावावर कर, नाहीतर जिवंत सो...

 बाप-लेकाच्या नात्याला काळीमा..! मालमत्तेसाठी पोटच्या मुलाने बापावर सुभेदारावर केला जीवघेणा हल्ला.. 'मालमत्ता नावावर कर, नाहीतर जिवंत सोडणार नाही'  दिली धमकी 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर :- ज्या हातांनी मुलाला लहानाचे मोठे केले,त्याच हातावर आज रक्ताचे डाग पाहण्याची दुर्दैवी वेळ एका पित्यावर आली आहे. अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरातील वैष्णवनगर येथे मालमत्तेच्या वादातून एका कलियुगी मुलाने आपल्या जन्मदात्या पित्यावर लोखंडी रॉडने भीषण हल्ला केला.ही घटना रविवारी (२६ एप्रिल) रात्री आठच्या सुमारास घडली असून, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सदाशिव शंकर भिंगारदिवे (वय ६१,रा.तिरंगा चौक,वैष्णवनगर) हे भारतीय सैन्यातून सुभेदार पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा २५ वर्षीय मुलगा शिवम भिंगारदिवे याला गांजा आणि मद्याचे भीषण व्यसन जडले आहे.व्यसनासाठी पैसे मिळवण्यासाठी तो घरात वारंवार वाद घालत असे.रविवारी रात्री शिवमने आपल्या वडिलांकडे घरातील सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर करून देण्याचा तगादा लावला. मात्र, "तू काहीही कामधंदा करत नाहीस, मग मालमत्ता नावावर कशी करू?" असा रास्त सवाल सदाशिव यांनी विचारला.यावरून संतापलेल्या शिवमने रागाच्या भरात लोखंडी रॉड उचलला आणि थेट वडिलांच्या डोक्यावर प्रहार केला.या हल्ल्यात सदाशिव यांच्या कपाळाला गंभीर जखम होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला.वडिलांना जखमी अवस्थेत पाहूनही शिवमचा राग शांत झाला नाही. "जर मालमत्ता माझ्या नावावर केली नाही तर तुला जिवंत सोडणार नाही," अशी धमकी देत त्याने घरात अश्लील शिवीगाळ केली. घरातील इतर सदस्यांनी मध्यस्थी करत आरडाओरडा केल्याने मोठा अनर्थ टळला.जखमी अवस्थेत सदाशिव भिंगारदिवे यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.आपल्याच मुलाने केलेल्या या कृत्यामुळे ते हादरून गेले आहेत.पोलिसांनी शिवम भिंगारदिवे विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

No comments