अहिल्यानगर पोलीस प्रशासना विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार..११ मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धरणे आंदोलन.. सचिन मोकळं अहिल्यानगर (सं...
अहिल्यानगर पोलीस प्रशासना विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार..११ मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धरणे आंदोलन..
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- जिल्ह्यातील वंचित समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या घटनांमध्ये पोलीस प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप करत,वंचित बहुजन आघाडीने प्रशासना विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.पोलिसांच्या कथित तांत्रिक फसवणुकीचा आणि पुरावे दडवण्याच्या वृत्तीचा निषेध करण्यासाठी दि.११ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर "जन आक्रोश धरणे आंदोलन" आयोजित करण्यात आले आहे.वंचित बहुजन आघाडीने पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.पीडितांच्या तक्रारींची दखल न घेणे,गंभीर गुन्ह्यांमध्ये केवळ 'NC' (अदखलपात्र गुन्हा) नोंदवून आरोपींना अभय देणे आणि पीडितांवरच खोटे प्रति-गुन्हे दाखल करणे,अशा प्रकारांमुळे जिल्ह्यात वंचितांवर अन्याय वाढत असल्याचे पक्षाने म्हटले आहे.माहिती दडवणे हा देखील गुन्हा असून प्रशासन दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष योगेश साठे आणि उत्तर जिल्हाध्यक्ष नगरसेवक संतोष चोळके यांनी केला आहे.

No comments