सातारा एलसीबी पोलीस निरीक्षक पदी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांची नियुक्ती; घोडकेंना जिल्ह्याचा दांडगा अनुभव! (सातारा जिल्हा) सौ. अनुज...
सातारा एलसीबी पोलीस निरीक्षक पदी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांची नियुक्ती; घोडकेंना जिल्ह्याचा दांडगा अनुभव!
(सातारा जिल्हा) सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सातारा जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी विश्वजीत घोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच पदावर जवळपास दोन पोलीस निरीक्षकांची फिल्डिंग चांगलीच दिसून येत होती. सध्याचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांची पोलीस मुख्यालयात उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अरुण देवकरांनी याच पदावर अनेक दिवसांपासून चांगलाच तळ ठोकला होता. त्यांच्या बदलीची अनेकांना प्रतीक्षा लागून होती. नव्याने आलेले पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना यापूर्वी सातारा जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात केलेल्या चांगल्याच कामाची पोचपावती आहे. पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी सातारा तालुका वाठार पुसेगांव त्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलीस दलात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात देखील उत्कृंष्ट दिली आहे. सर्वसामान्यांना प्रथम न्याय देणारे आणि खाकी वर्दींतील आपलेपणा जपणारे अधिकारी म्हणून घोडके यांना ओळखले जाते. सातारच्या एलसीबी पोलीस निरीक्षक म्हणून आता घोडकेंची ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. जिल्ह्याचा दांडगा अनुभव आणि अभ्यास असणाऱ्या अखेर अधिकाऱ्याची या पदावर पोलीस निरीक्षक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी नियुक्ती केली आहे. घोडक्यांबरोबरच जिल्ह्यातील पाच पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे देखील आदेश पोलीस अधीक्षकांनी जारी केले आहेत. यामध्ये पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे शाहूपुरी पोलीस ठाण्यात तर राजकुमार भुजबळ फलटण ग्रामीण पोलीस ठाणे तर सचिन म्हेत्रे सातारा शहर पोलीस ठाणे तर संदीप जगताप सायबर पोलीस ठाणे अशा अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या नवीन पदस्थापने ठिकाणीचा पदभार घेवुन तसा अहवाल मुख्यालयाकडे सादर करावा असेही बदल्या आदेशात म्हटले आहे.

No comments