adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गटाराच्या पाण्यावर उगवलेले गवत; नालासोपाऱ्यात धक्कादायक प्रकार उघड सामाजिक कार्यकर्ती रूचिताताई नाईक यांचा आरोप; डासांच्या वाढत्या उपद्रवाबाबतही चिंता

 गटाराच्या पाण्यावर उगवलेले गवत; नालासोपाऱ्यात धक्कादायक प्रकार उघड सामाजिक कार्यकर्ती रूचिताताई नाईक यांचा आरोप; डासांच्या वाढत्या उपद्रवाब...

 गटाराच्या पाण्यावर उगवलेले गवत; नालासोपाऱ्यात धक्कादायक प्रकार उघड

सामाजिक कार्यकर्ती रूचिताताई नाईक यांचा आरोप; डासांच्या वाढत्या उपद्रवाबाबतही चिंता 


अमोल बावस्कार मुंबई

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

नालासोपारा, ता. ४ : शहरातील समेळपाडा परिसरात महानगरपालिकेच्या आरक्षित सांडपाणी प्रकल्पाच्या जागेवर गवत जलद उगवण्यासाठी गटारातील दुर्गंधीयुक्त पाण्याचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सामाजिक कार्यकर्ती रूचिताताई नाईक यांनी उघड केला असून त्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात पंप व यंत्रणा बसवून रात्री उशिरा, विशेषतः मध्यरात्रीनंतर गटाराचे पाणी गवत वाढीसाठी सोडले जाते. ही यंत्रणा गवताखाली लपवून ठेवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दररोज मोठ्या प्रमाणात हे गवत काढून ते तबेले व गोठ्यांमध्ये ५ ते १० रुपये किलो दराने विकले जात असल्याने लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

 या संपूर्ण प्रकारात महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याने कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोपही रूचिताताई नाईक यांनी केला आहे. गटाराच्या सांडपाण्यावर उगवलेले हे गवत जनावरांच्या आरोग्यास घातक ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तसेच या प्रकारामुळे नालासोपारा पश्चिम भागात डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक ११ मधील नगरसेवकांनी या ठिकाणी पाहणी केली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. लवकरच नव्याने नियुक्त आयुक्तांची भेट घेऊन संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचे रूचिताताई नाईक यांनी सांगितले.

No comments