दोन गटात तुफान हाणामारी धारदार शस्त्रांचा वापर ; कासोदा पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल...! कासोदा ता. एरंडोल (सागर शेलार ) (संपादक -:- ...
दोन गटात तुफान हाणामारी धारदार शस्त्रांचा वापर ; कासोदा पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल...!
कासोदा ता. एरंडोल (सागर शेलार )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कासोदा ता. एरंडोल:- येथे हिस्से वाटणीच्या जुन्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी आणि गंभीर दुखापतीची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून , कासोदा पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
घटनेची माहिती:
शुक्रवार, दिनांक ०४/०४/२०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता कासोदा शहरातील टी.टी.एस. चौक परिसरात ही घटना घडली. जुना वाद चव्हाट्यावर आल्याने त्याचे रूपांतर मारामारीत झाले.
पहिला गुन्हा :
शेख मुद्दस्सर उर्फ अबू शेख फिरोज (वय २८, रा. शेख मोहल्ला, कासोदा) यांनी फिर्याद दिली. हिस्से वाटणीवरून शिवीगाळ व मारहाण झाली. धारदार शस्त्राने (चाकू) गंभीर दुखापत केली आणि ॲक्वा पाण्याच्या गाडीचे नुकसान केले असे फिर्यादीत नमूद आहे.याप्रकरणी ०५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दुसरा गुन्हा :
शेख शाहदाब शेख मुस्ताक (वय ३२, रा. शेख मोहल्ला, कासोदा) यांनी दुसरी फिर्याद दिली. त्यांच्या भावासोबत झालेल्या वादातून काही व्यक्तींनी दुकानासमोर येऊन शिवीगाळ , मारहाण आणि दुकानात घुसून तोडफोड केली. लोखंडी पाईपने मारून गंभीर दुखापत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणीही ०५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कारवाई :
दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध मारामारी, गंभीर दुखापत, धमकी आणि मालमत्तेचे नुकसान या कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक केली आहे. स.पो.नि.श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस अंमलदार राकेश खोंडे आणि किरण गाडीलोहार करत आहेत.

No comments