एन.एम.एम.एस. परीक्षेत निपुण पाटील तालुक्यात प्रथम; आडगावचा अभिमान उंचावला चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा : ता...
एन.एम.एम.एस. परीक्षेत निपुण पाटील तालुक्यात प्रथम; आडगावचा अभिमान उंचावला
चंद्रकांत पाटील विचखेडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा : तालुक्यातील आडगाव येथील शेतकरी केशरलाल माधव पाटील यांचा नातू व कांतीलाल पाटील यांचा मुलगा निपुण पाटील याने एन.एम.एम.एस. (नॅशनल मेरिट कम मीन्स स्कॉलरशिप) परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
विवेकानंद विद्यालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या निपुणने या शिष्यवृत्ती परीक्षेत 180 पैकी 128 गुण मिळवत अव्वल स्थान मिळवले. त्याच्या या यशामुळे आडगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
निपुणच्या यशाबद्दल ब्रिलियंट सायन्स क्लासचे संचालक वाय. डी. पाटील सर, विवेकानंद विद्यालयाचे अध्यक्ष डॉ. विकास काका हरताळकर, मुख्याध्यापक भावे तसेच शिक्षक-शिक्षिका यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले आहे.
निपुण हा चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवराम पाटील व केशरलाल पाटील यांचा नातू असून, कुटुंबीयांच्या मार्गदर्शनासोबतच त्याच्या मेहनत व जिद्दीमुळे हे यश शक्य झाल्याचे बोलले जात आहे.

No comments