adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर कुरेशी मोहल्ला नागरिकांना मूलभूत सुविधच्या अभावामुळे गैरसोई मुख्याधिकारी यांना निवेदन सादर

 फैजपूर कुरेशी मोहल्ला नागरिकांना मूलभूत सुविधच्या अभावामुळे गैरसोई मुख्याधिकारी  यांना निवेदन सादर   इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकां...

 फैजपूर कुरेशी मोहल्ला नागरिकांना मूलभूत सुविधच्या अभावामुळे गैरसोई मुख्याधिकारी  यांना निवेदन सादर  


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील कुरेशी मोहल्ला परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी नगर परिषद फैजपूर चे मुख्याधिकारी अविनाश गागोंडे तसेच नगराध्यक्ष दामिनी पवन सराफ यांना लेखी निवेदन देऊन तात्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे. निवेदनानुसार, कुरेशी मोहल्ल्याच्या मागील धाडी नदी रस्त्यावर पायऱ्यांचा अभाव असल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणी येत आहेत. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती गंभीर समस्या व अपघात होण्याची शक्यता वाढते. तसेच, गणपती वाडी परिसराकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे.

याशिवाय, श्रीराम टाकीच्या मागील बाजूस असलेले महिला शौचालय अत्यंत जिर्ण अवस्थेत असून त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. तसेच पुरुषांसाठी नवीन शौचालय बांधण्याची मागणीही करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशासनास इशारा दिला आहे की, या समस्यांकडे तात्काळ लक्ष देऊन कार्यवाही न झाल्यास पुढील काळात आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल. या वेळी एम पी जे स्थानिक शहर अध्यक्ष रहीमुद्दीन, रफीक कुरेशी, साईम कुरेशी, शेख मोईन, शेख जावेद, शेख मुबश्शिर आदी उपस्थित होते.

No comments