adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पुस्तके आपल्याला आयुष्यभर मार्गदर्शन करतात - रमण महाजन

 पुस्तके आपल्याला आयुष्यभर मार्गदर्शन करतात - रमण महाजन  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) न्हावी ता.यावल:-  आजच्या डिजिटल यु...

 पुस्तके आपल्याला आयुष्यभर मार्गदर्शन करतात - रमण महाजन 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

न्हावी ता.यावल:-  आजच्या डिजिटल युगात मोबाईल सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या झगमगटात पुस्तक वाचण्याची सवय काहीशी मागे पडत चालली असताना  पुस्तक हेच खरे आयुष्य घडवणारे शिक्षक असल्याचे विसरता कामा नये. शिक्षक हे आपल्याला काही काळ शिकवतात मात्र पुस्तके आपल्याला आयुष्यभर मार्गदर्शन करत असतात. जागतिक पुस्तक दिवस हा केवळ पुस्तकांचा उत्सव नसून ज्ञानाची कास धरणाऱ्या प्रत्येक वाचकांसाठी प्रेरणादायी पर्व आहे असे प्रतिपादन रमण महाजन यांनी केले.

   येथील श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व  ग्रंथालयामध्ये दिनांक २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटना प्रसंगी  उद्घाटक म्हणून रमण महाजन बोलत होते. प्रसंगी श्री गणेश वाचनालय व ग्रंथालयाचे अध्यक्ष हेमकांत गाजरे,उपाध्यक्ष शरद चोपडे,सचिव युवराज तळेले, नरेंद्र बोरोले, युवराज इंगळे , लीलाधर तळेले, ग्रंथपाल ललित इंगळे, सहा ग्रंथपाल सौ. कविता इंगळे, ललिता सोनवणे,इंदू झोपे,  कर्मचारी भास्कर भोगे  व वाचक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्रंथपाल ललित इंगळे यांनी मानले.

No comments