adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

करंजखोप च्या जानुबाई देवीची यात्रा मंगळवार बुधवार, यात्रेनिमिंत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन!

 करंजखोप च्या जानुबाई देवीची यात्रा मंगळवार बुधवार, यात्रेनिमिंत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन!  (सातारा जिल्हा) सौ. अनुजा कारखेले देवरे प्रतिन...

 करंजखोप च्या जानुबाई देवीची यात्रा मंगळवार बुधवार, यात्रेनिमिंत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन! 


(सातारा जिल्हा) सौ. अनुजा कारखेले देवरे प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

उत्तर कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावचे जागृत श्री. जानुबाई  देवीची सालाबाद प्रमाणे मंगळवार बुधवार वार्षिक यात्रेनिमिंत्त मनोरंजनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. 28  सायंकाळी गावातून पालखी मिरवणूक देवीचा छबिना तर बुधवार दिनांक 29 सकाळी 10 ते 4 लोकनाट्य सविता-राणी पुणेकर यांचा भारदार कार्यक्रम होणार आहे. जानुबाई देवीच्या यात्रेनिमिंत्त  करंजखोप गावामध्ये पै. पाहुवणे मंडळी तसेच मिठाईची तसेच इतर दुकानांनी करंजखोप गाव बहारले आहे. येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे करंजखोप ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. जानुबाई देवीच्या यात्रेनिमिंत्त वाठार पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

No comments