डॉ. विजय राठोड यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला; प्रशासनाच्या माध्यमांतून कामाला गती देणार ! (कोल्हापूर जिल्हा) सौ. अ...
डॉ. विजय राठोड यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला; प्रशासनाच्या माध्यमांतून कामाला गती देणार !
(कोल्हापूर जिल्हा) सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेला नवसंजीवनी देत डॉ. विजय राठोड यांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. विद्यमान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून ही जबाबदारी स्वीकारली आहे.तर अमोल येडगे यांची छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर नियुक्ती झाली आहे. डॉ. राठोड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तात्काळ विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत जिल्ह्यातील प्रलंबित कामे, विकास प्रकल्प आणि नागरिकांशी संबंधित प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी बोलताना डॉ. राठोड यांनी सांगितले की, “प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर भर देणार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या वेळेत सोडवणे ही प्राथमिकता असेल.” तसेच शासकीय योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करून विकासकामांना गती देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील प्रशासन अधिक कार्यक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोल्हापूरच्या प्रशासनात चांगलाच बदल दिसून आला यामध्ये कोल्हापूर जिल्हाधिकारी झेडपी सिईओ आणि मनपा आयुक्तांची एकाच दिवशी बदली करण्यात आल्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रशासनात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे.

No comments