adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डॉ. भारत बास्टेवाड यांनी लातूर जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला, तर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची मुंबईला बदली !

 डॉ. भारत बास्टेवाड यांनी लातूर जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला, तर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची मुंबईला बदली !   सौ. अनुजा कारखे...

 डॉ. भारत बास्टेवाड यांनी लातूर जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला, तर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची मुंबईला बदली ! 


 सौ. अनुजा कारखेले-देवरे ( लातूर जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 लातूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्याकडून पदभार स्वीकारला. वर्षा ठाकूर-घुगे या लातूर जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला होता. डॉ.भारत बास्टेवाड हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नागपूर) येथे आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर  जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्यात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले होते. तसेच जिल्ह्यातील विविध योजना महसूल विभागाच्या कामात शिस्त आणण्याचा प्रयत्न त्यांनी चांगलाच केला होता आता त्यांची बदली मुंबई औद्योगिक विकास महामंडळात सहमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर झाली आहे. तर त्यांच्या रिक्त जागेवर डॉ. भारत बास्टेवाड हे अनुभवी आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे लातूर जिल्ह्याच्या प्रशासकीय कामांना गती मिळण्याची अपेक्षा आता लातूरकरांकडून व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनाही शिस्तप्रिय महिला आयएएस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी लातूर जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील लातूरकरांना दिसून आल्या त्यांनी आपल्या कार्यकाळात एक वेगळी छाप लातूरकरांना दाखवली होती.

No comments