अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदलीच्या प्रकरणाने आता प्रशासनाचा खरा चेहरा उघड? आदेशांना केराची टोपली, की ‘संरक्षण’ कोणाचे? काल्प...
अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदलीच्या प्रकरणाने आता प्रशासनाचा खरा चेहरा उघड?
आदेशांना केराची टोपली, की ‘संरक्षण’ कोणाचे?
![]() |
| काल्पनिक फाईल फोटो |
जळगाव सार्वजनिक बांधकाम मंडळातील अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदलीच्या प्रकरणाने आता प्रशासनाचा खरा चेहरा उघड केला आहे. सहा-सहा वेळा विभागीय आयुक्त, नाशिक यांचे आदेश येतात, पत्रांवर पत्रे निघतात, तक्रारींचा पाऊस पडतो… पण कारवाई मात्र शून्य! हा प्रकार म्हणजे आदेशांची थेट थट्टा नाही तर काय? सामान्य नागरिकाने एखादा अर्ज केला तर त्याला महिनोनमहिने दारात उभे ठेवले जाते. पण येथे एक पत्रकार — हेमकांत गायकवाड — सातत्याने तक्रारी करत आहेत, पुरावे देत आहेत, पाठपुरावा करत आहेत… तरीही प्रशासन ‘झोपेत’ आहे. ही झोप नैसर्गिक आहे का, की मुद्दाम घेतलेली आहे?
प्रश्न सरळ आहे — प्रशांत सोनवणे यांना कोण वाचवत आहे?कोणाच्या आशीर्वादामुळे सहा वेळा आलेले आदेशही निष्प्रभ ठरत आहेत? प्रशासनात काम करणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्यांसाठी हा प्रकार धोक्याची घंटा आहे. कारण, जर एखाद्याविरुद्ध गंभीर तक्रारी असूनही त्याच्यावर कारवाई होत नसेल, तर “प्रामाणिकपणा” ही गोष्ट हास्यास्पद ठरते. विशेष म्हणजे, विभागीय आयुक्तांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेशही जर खालील स्तरावर ‘फाईलमध्ये दाबून’ ठेवले जात असतील, तर ही केवळ निष्क्रियता नसून उघडपणे शिस्तभंग आहे. ही बाब शासनासाठी लज्जास्पद आहे. याहून गंभीर बाब म्हणजे, या सर्व प्रकारामुळे जनतेचा प्रशासनावरचा विश्वास ढासळत चालला आहे. “तक्रार करा, पण काहीच होणार नाही” असा संदेश जर समाजात गेला, तर लोकशाहीचा पाया कमजोर होईल.
आता वेळ आली आहे थेट कारवाईची! या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. आदेशांची अंमलबजावणी टाळणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी. अन्यथा, “आदेश” हा शब्दच केवळ दिखावा ठरेल आणि प्रशासनावरचा उरलेला विश्वासही पूर्णपणे संपुष्टात येईल.
जनतेचा प्रश्न स्पष्ट आहे —
“कारवाई कधी होणार?”
शब्दांकन
हेमकांत बळीराम गायकवाड
सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता तथा पत्रकार
मो.७७९८२०२४८८

No comments