adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सनपूले येथे विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे दिड एकर वरील मक्का व ठिबक नळ्या जळून खाक लाखो रुपयांचे नुकसान

 सनपूले   येथे  विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे दिड  एकर वरील मक्का व  ठिबक नळ्या जळून खाक लाखो रुपयांचे  नुकसान  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेम...

 सनपूले   येथे  विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे दिड  एकर वरील मक्का व  ठिबक नळ्या जळून खाक लाखो रुपयांचे  नुकसान 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

   चोपडा  ता १७ येथून जवळच असलेल्या                         सनपूले तालुका चोपडा येथील   शेत शिवारात  संजय ज्ञानेश्वर पाटील यांच्या गट नंबर 397  मधील शेतातील मक्का विद्युत डिपी वर झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे पूर्णतः जळून खाक झाला ही घटना    आज   दि १७   रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली दुपारी 1 वाजेनंतर शेतातील मजूर घरी गेल्यानंतर  दिवसापाळी  लाईट सुरू असल्याने दुपारी अचानक शॉर्ट सर्किट झाले  त्यात संबंधित शेतातील मक्का पूर्णतः जळून खाक झाला व त्यात आय एस आय कंपनीच्या  ठिबक च्या नळ्या देखील पूर्ण बेचिराख झाल्या ह्या मुळे शेतकऱ्याचे लाखोंचे रूपयाचे  नुकसान झाले 5 महिन्यापासून लहान मुलाप्रमाणे पीक वाढीस लाऊन वेळोवेळी खत वॉटर सोल्यूबल खते निंदनी करून शेतकरी पीक वाढीस लावतो त्यात नुकतीच मागील महिन्यात अवकाळी पावसाने नुकसान केले होते त्यात कसे बसे वाचून एन तोंडाशी आलेला घास वीज वितरण कंपनीच्या हलगर्जी पणामुळे नेहमीच शॉर्ट सर्किट सारख्या घटना शेतात घडत असतात त्या मुळे आज शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले तरी पंचनामा करून  महवितरण  कंपनी कडून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी संजय पाटील यांनी केली आहे 

० प्रतिक्रिया   ( संजय पाटील 

शेतकरी सनपुले ता चोपड़ा )  

 दुपारी अचानक झालेल्या शॉक सरकिटमुळे माझ्या शेतातील ट्रान्स फॉर्म मध्ये मोठा आवाज झाला व क्षणात आगिने  रोद्र रूप धारण केले त्यात क्षणात शेतातील मका व ठिबकच्या नळ्या जळून पूर्ण पणे खाक झाल्या यात माझे  एक लाखाच्या वर नुकसान झाले आहे तरी मला भरपाई मिळावी व तसेच  लोबकलेले तार व वाकलेले विद्युत पोल कंपनी कडून तात्काळ सुरळीत व्हावे

No comments