adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महिला अत्याचार प्रकरणातील माजी महापौर अभिषेक कळमकरला न्यायालयाचे स्टँडिंग वॉरंट'.. हजर न झाल्यास मालमत्ता जप्तीची तयारी..!

 महिला अत्याचार प्रकरणातील माजी महापौर अभिषेक कळमकरला न्यायालयाचे स्टँडिंग वॉरंट'.. हजर न झाल्यास मालमत्ता जप्तीची तयारी..!  सचिन मोकळं ...

 महिला अत्याचार प्रकरणातील माजी महापौर अभिषेक कळमकरला न्यायालयाचे स्टँडिंग वॉरंट'.. हजर न झाल्यास मालमत्ता जप्तीची तयारी..! 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-विळद घाट परिसरात नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करणाऱ्या आणि त्याचे चित्रीकरण करून धमकी देणाऱ्या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी महापौर अभिषेक बाळासाहेब कळमकर याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.वारंवार शोध घेऊनही आरोपी मिळून येत नसल्याने, /आता न्यायालयाने त्याच्याविरुद्ध 'फरार' घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ठराविक मुदतीत हजर न झाल्यास त्याची मालमत्ता जप्त करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.आरोपी अभिषेक कळमकर (रा.भुतकरवाडी चौक, सावेडी,अहिल्यानगर) याने १८ फेब्रुवारी २०२६ पूर्वी फिर्यादी महिलेला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. या बहाण्याने त्याने पीडितेवर वेळोवेळी जबरदस्तीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, या कृत्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि फिर्यादीसह तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५१(२), ६४(१), ६४(२)(m), ६९ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(E) नुसार गुन्हा (गु. र. नं. १३२/२०२६) दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार आहे.पोलिसांनी महाराष्ट्रभर त्याचा शोध घेतला, मात्र तो हाती लागला नाही. त्यानंतर त्याच्याविरुद्ध 'स्टँडिंग वॉरंट' काढण्यात आले होते. पोलीस तपासाला हुलकावणी देणाऱ्या अभिषेक कळमकर विरुद्ध आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम ८४ प्रमाणे कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

न्यायालयासमोर हजर होण्याचे आदेश: मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (कोर्ट नं. ०३, अहमदनगर) यांनी आरोपीला तात्काळ हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.जर आरोपी विहित वेळेत न्यायालयासमोर हजर झाला नाही,तर त्याला अधिकृतपणे 'फरार आरोपी' घोषित केले जाईल.त्यानंतर पुढील पाऊल म्हणून प्रशासनाकडून त्याच्या मालमत्ता जप्तीची (Property Attachment) कठोर कारवाई करण्यात येईल,असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हा जाहीरनामा सार्वजनिक ठिकाणी दर्शनी भागात लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, नागरिकांना या आरोपीबाबत काही माहिती असल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments