आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेची आज बैठक रावेर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेची दिनांक १३/४/२०२६ र...
आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेची आज बैठक
रावेर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेची दिनांक १३/४/२०२६ रोज सोमवार वेळ सायंकाळी ४वाजता ठिकाण शासकीय विश्रामगृह सावदा येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे सदर बैठकीस आसेमं संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजु बिर्हाम तडवी प्रदेश अध्यक्ष कामील नामदार तडवी कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ईरफान तडवी सर,अनिल तडवी गुरुजी व सर्व प्रदेश कार्यकारिणी सन्माननीय पदाधिकारी सदस्य जळगांव जिल्हा जिल्हाध्यक्ष युवा जिल्हाध्यक्ष पोलीस पाटील समिती,सर्व तालुका अध्यक्ष तथा सन्माननीय पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते यांनी अगत्याने सहभागी होऊन उपस्थिती द्यावी ही विनंती
सदर बैठकीत खालील मुद्दे विषयांवर चर्चा विचारविनिमय करण्यात येणार आहेत
१)दि १० मे रोजी आसेमं महापरिवार आयोजित ३० वा सामुहिक विवाह सोहळा बाबत आर्थिक, भोजन समिती नेमणे, वधू वर विवाह नोंदणी, देणगीदार मदत,कार्य कर्तव्य बाबत चर्चा करणे
२) पदाधिकारी यांच्या वर सामुहिक विवाह सोहळ्याची कार्य जबाबदारी निश्चित करणे
३)आसेमं आदिवासी सेवा मंडळ महापरिवार मध्ये सामील होण्यासाठी इच्छुक नवीन पदाधिकारी कार्यकर्ते यांचे प्रवेश निश्चित करणे व पदाधिकारी निवड जबाबदारी निश्चित करणे बाबत
या सोबतच आयत्यावेळी येणाऱ्या विविध विषयांवर चर्चा विचारविनिमय करण्यात येणार आहेत तरी आपली सर्वांची उपस्थिती क्रमप्राप्त आहे तरी आपण सर्वांनी उपरोक्त वेळेत निर्देशित ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे जळगांव जिल्हाध्यक्ष मुबारक उर्फ राजू अलीखा तडवी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

No comments