खाकीचा दणका..एलसीबीने कत्तलखान्यावर धाड टाकून ५ आरोपींना ठोकल्या बेड्या... सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर:-...
खाकीचा दणका..एलसीबीने कत्तलखान्यावर धाड टाकून ५ आरोपींना ठोकल्या बेड्या...
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:-जिल्ह्यात गोवंश हत्या आणि अवैध मांस विक्री विरुद्ध पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उघडलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. शेवगाव शहरातील ईदगाह मैदान परिसरात सुरू असलेल्या एका अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) रविवारी पहाटे छापा टाकून पाच जणांना बेड्या ठोकल्या.या कारवाईत पोलिसांनी २०० किलो गोमांस आणि एका गोवंशीय जनावराची सुटका केली आहे.गुप्त बातमीदाराने दिले 'लोकेशन'
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक शेवगाव भागात गस्तीवर असताना, ईदगाह मैदाना शेजारी मुनावर अब्बास कुरेशी हा त्याच्या साथीदारांसह गोवंश कत्तल करून मांस विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.पोलिसांनी वेळ न घालवता पहाटेच्या अंधारात सापळा रचला आणि कत्तलखान्यावर धाड टाकली.
पोलिसांनी झडप घातली अन...
छापा टाकला तेव्हा काही इसम प्रत्यक्ष गोमांसाची विक्री करत होते.पोलिसांनी घटनास्थळावरून पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
मुनावर अब्बास कुरेशी (वय ४८, रा. शेवगाव),अदनान मन्सुर कुरेशी (वय २३, रा. सम्राट अशोकनगर, शेवगाव),जावेद अहमद शेख (वय ३५, रा. नायकवाडी मोहल्ला,शेवगाव),जाकीर मोहम्मद शेख (वय ४०, रा. शेवगाव),जावेद फकीर मोहम्मद शेख (वय ४२, रा. शेवगाव),६८ हजारांचा मुद्देमाल जप्त या कारवाईत पोलिसांनी केवळ आरोपींनाच पकडले नाही, तर मोठ्या प्रमाणात मुद्देमालही हस्तगत केला आहे:
गोमांस: २०० किलो (किंमत ४०,००० रुपये)
जीवंत जनावर: १ गोवंशीय जनावर (किंमत ५,००० रुपये)
साहित्य: वजनकाटा, २ चाकू, सुरा, कुऱ्हाड आणि टोचा.
इतर: २०,००० रुपयांचे दोन मोबाईल.
एकूण जप्त मुद्देमाल: ६८,५०० रुपये.
गुन्हा दाखल, तपास सुरू
अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २७१, ३२५, ३(५) आणि प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(क), ९ नुसार शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे पथक:
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार, पोउपनि दीपक मेढे, अंमलदार राहुल द्वारके, भीमराज खर्से, राहुल डोके, किशोर शिरसाठ, महिला अंमलदार वंदना मोढवे, भाग्यश्री भिटे आणि चालक चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली.

No comments