दहा हजारपेक्षा अधिक सह्यांचे निवेदन देऊन गो हत्या बंदीची व गो मातेला राष्ट्रमाता घोषित करण्याची गो भक्तांनी केली मागणी चोपडा प्रतिनिधी (सं...
दहा हजारपेक्षा अधिक सह्यांचे निवेदन देऊन गो हत्या बंदीची व गो मातेला राष्ट्रमाता घोषित करण्याची गो भक्तांनी केली मागणी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा -गेल्या तीन महिन्यापासून गो सम्मान आव्हान अभियानाचा आवाज संपूर्ण तालुक्यात घुमत होता. 27एप्रिल हा दिवस गो सम्मान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. सकाळी 10वाजता श्रीराम मंदिर गांधी चौक चोपडा येथे नंदी बाबा व गो मातेची विधिवत पूजा करून गो मातेची आरती झाली. गो मातेची पूजा बाबा महाहंसजी महाराज, ह भ प सुशील महाराज, मा विधान सभेचे मा अध्यक्ष अरुणलाल गुजराथी साहेब, देवकांत के चौधरी व त्याची धर्म पत्नी सौ धनश्री चौधरी, के डी चौधरी, टी एम चौधरी, मोरे अप्पा, लखन तेली, नगर सेवक गजू जैसवाल, नगरसेवक नरेंद्र पाटील, आत्मारामजी म्हाळके, ज्ञानेश्वर पाटील, सतीश पाटील, राजेंद्र पाटील, ह भ प बापू महाराज, आजी माजी नगर सेवक यांनी गोमातेला गूळ देऊन पूजा केली.
शोभा यात्रेत हजारोचा जनसमुदाय उपस्थित होता. शहर व तालुक्यातून गो भक्त मोठया संख्येने उपस्थित झाला. शोभा यात्रेत पुरुष, महिला, युवक युवती यांचा सहभाग होता.
यात्रेत बैलगाडी सजवलेली होती. नंदी बाबा व गोमाता यांना शृंगार केलेला होता. शोभा यात्रेत गोमाता राष्ट्रमाता, गोमाता बचेंगी देश बचेंगा, जय गोमाता जय गोपाल अशा घोषणा देण्यात येत होत्या.
शोभयात्रेच्या मार्गात महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यास टी एम चौधरी यांनी माल्यार्पण केले. बाबासाहेब यांच्या पुतळ्यास बाबा महाहंसजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ह भ प सुशिलजी महाराज यांनी माल्यार्पण केले. शोभा यात्रा प्रमुख मार्गांवरून तहसील कार्यालयापर्यंत आल्यावर बाबा महाहंसजी महाराज, सुशिलजी महाराज, के डी चौधरी व गो भक्तांच्या उपस्थितीत दहा पेक्षा अधिक सह्यांचे निवेदन देण्यात आले. मा तहसीलदार यांना देण्यात आले. म राष्ट्रपती महोदय, मा पंतप्रधान महोदय ,मा राज्यपाल महोदय, मा मुख्यमंत्री महोदय अशा चार नावानी निवेदन मा तहसीलदार यांचे मार्फत देण्यात आली. म तहसीलदार थोरात साहेब यांनी त्वरित पाठवीत असल्याचे सांगून गो भक्तांचे समाधान केले. निवेदणाद्वारे गो मातेची सेवा, सुरक्षा व सम्मान मिळावा म्हणून मागण्या प्रार्थनापत्र देऊन केल्या. गो मातेची हत्या तात्काळ बंद करा. गो हत्या करणार्यांना फाशीची शिक्षा देण्या संबंधी कडक कायदा करा. गो मातेला राष्ट्रामातेचा दर्जा देऊन सन्मान करा. अशा अनेकविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
शोभा यात्रेत व्यापारी मंडळी व गो भक्तांनी पिण्याची उत्तम व्यवस्था केली. चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री देसले साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला. पत्रकार मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.उपस्थितांचे आभार टी एम चौधरी यांनी म्हणालेत.

No comments