वनकर्मचाऱ्याला झाडाला बांधून चंदनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या..उच्च न्यायालयातले चंदनाची झाडे चोरल्...
वनकर्मचाऱ्याला झाडाला बांधून चंदनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या..उच्च न्यायालयातले चंदनाची झाडे चोरल्याची दिली कबुली
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :-शासकीय कार्यालयांच्या परिसरातून चंदनाची झाडे चोरणाऱ्या एका अट्टल टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे.वनविभागाच्या जिल्हा कार्यालयात वनमजुराला झाडाला बांधून ठेवत दहशत निर्माण करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत.दि.१८ एप्रिल २०२६ रोजी रात्री २:१५ वाजेच्या सुमारास अहिल्यानगर येथील वनविभागीय कार्यालयात खळबळजनक घटना घडली होती.रात्रपाळीवर तैनात असलेले वनमजूर रमेश पोपट शेळके (वय ५८) यांना चार अज्ञात आरोपींनी जबरदस्तीने अशोकाच्या झाडाला बांधून घातले.त्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक यांच्या निवासस्थानाजवळ असलेली २०,००० रुपये किमतीची दोन चंदनाची झाडे तोडून चोरून नेली होती.याप्रकरणी अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.पोनि.श्री. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुन्ह्याच्या ठिकाणची पाहणी केली आणि तांत्रिक कौशल्याचा वापर करून आरोपींचा शोध सुरू केला.छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील सिल्लोड,बदनापूर,अजिंठा यांसारख्या अतिसंवेदनशील भागात सलग ५ दिवस शोधमोहीम राबवल्यानंतर पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली.मसीद नसीब गोलवाल (वय २४ वर्षे, रा. जंजाळा,ता.सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर),शाहीदखा अलीखा कलेसे (वय २६ वर्षे, रा. जंजाळा, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर),असलमखा भुरेखा पठाण (रा. माहुली, आडगांव, नसीबखा मुनीरखा जोनवाल (रा. माहुली, आडगांव)
उच्च न्यायालयाच्या परिसरातूनही केली होती चोरी
तपासा दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.या आरोपींनी केवळ वनविभागातूनच नव्हे, तर मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथूनही चंदनाची झाडे चोरल्याची कबुली दिली असून,त्या गुन्ह्यातही ते फरार होते. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली २०,००० रुपये किमतीची CBZ मोटारसायकल (MH 28 W 9738) जप्त केली आहे.
तपास पथकाची कामगिरी:
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. किरणकुमार कबाडी,सपोनि. हरिष भोये,पोउपनि.राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सुनिल पवार, फुरकान शेख,शाहिद शेख, गणेश धोत्रे,बाळासाहेब नागरगोजे,अमृत आढाव, भाऊसाहेब काळे,बाळासाहेब खेडकर,प्रशांत राठोड, किशोर शिरसाठ,योगेश कर्डीले,भगवान धुळे,अरुण मोरे आणि महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांच्या पथकाने केली आहे.पुढील तपास अहिल्यानगर कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.

No comments