adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धावत्या एसटीची चाके निखळली; प्रवाशांचे जीव धोक्यात, मलकापूर आगारावर भ्रष्टाचाराचे आरोप

 धावत्या एसटीची चाके निखळली; प्रवाशांचे जीव धोक्यात, मलकापूर आगारावर भ्रष्टाचाराचे आरोप  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...

 धावत्या एसटीची चाके निखळली; प्रवाशांचे जीव धोक्यात, मलकापूर आगारावर भ्रष्टाचाराचे आरोप 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मलकापूर आगाराच्या निष्काळजी व कथित भ्रष्ट कारभाराचा गंभीर प्रकार समोर आला असून हरणखेड–मलकापूर मार्गावर धावणाऱ्या एसटी बसची मागील चाके धावत्या स्थितीतच निखळल्याने मोठी दुर्घटना टळता टळली. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचले असून या घटनेमुळे आगार व्यवस्थापनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

एमएच ४० वाय ५८५२ क्रमांकाची बस ड्युटी क्रमांक १३८ वर हरणखेडहून मलकापूरकडे येत असताना अचानक मागील टायरचा संपूर्ण संच (हब व अॅक्सलसह) बाहेर पडला. बस एका बाजूला कलली; मात्र चालक एस. यू. जायभाय यांनी तत्परतेने नियंत्रण मिळवत बस सुरक्षित थांबवली. त्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली.

घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे मलकापूर तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील यांनी घटनास्थळी भेट देत आगार व्यवस्थापनावर तीव्र टीका केली. काही दिवसांपूर्वीच ड्युटी अलॉकेशनमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. आजच्या घटनेने त्या आरोपांना बळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेनंतर एसटी प्रशासनाच्या देखभाल व नियोजनातील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. भंगार अवस्थेतील बसांना फिटनेस कसा दिला जातो, ड्युटी नियोजनात पारदर्शकता का नाही, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असलेला निधी नेमका कुठे वापरला जातो, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

दिपक चांभारे पाटील यांनी इशारा देत म्हटले की, आगारातील  निष्काळजीपणामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत आहे. तातडीने सुधारणा करून दोषींवर कारवाई न झाल्यास शिवसेना आंदोलन छेडेल.

दरम्यान, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मलकापूर आगाराच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

No comments