adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पत्नीचे गावात झंगाट प्रियकरांच्या मुलांच्या मदतीने पतीला संपविले, कवठेमहांकाळ पोलिसांनी पत्नी, मुले, प्रियकरावर केला गुन्हा दाखल!

पत्नीचे गावात झंगाट प्रियकरांच्या मुलांच्या मदतीने पतीला संपविले, कवठेमहांकाळ पोलिसांनी पत्नी, मुले, प्रियकरावर केला गुन्हा दाखल!  ( सांगली ...

पत्नीचे गावात झंगाट प्रियकरांच्या मुलांच्या मदतीने पतीला संपविले, कवठेमहांकाळ पोलिसांनी पत्नी, मुले, प्रियकरावर केला गुन्हा दाखल! 


( सांगली जिल्हा ) सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 महाराष्ट्रांत सध्या कौटुंबिक गुन्हेगारी आणि अनैतिक संबंधांच्या घटनेत चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना सांगली जिल्ह्यांतून समोर आली आहे. यामध्ये दोन मुलाची आई निलाबाई प्रेमात अंध झाली  आपल्या पोटच्या दोन मुलांची मदत अन् प्रियकरांच्या मदतीने आपल्या  पतीचा काटा काढल्याची घटना कवठेमहांकाळ तालुक्यांतून समोर आली आहे. करोली टी. येथील भारत करपे यांच्या हत्येप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी त्याची पत्नी दोन मुले आणि प्रियकर अशा चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा खून केला आहे. या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून मृत भारत करपे आणि त्याची पत्नी निलाबाई करपे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वादाची ठिणगी पडली होती. निलाबाईचे गावातीलच बाबाजी करपे याच्याशी अनैतिक संबंध होते. याला भारत करपे याचा कडक विरोध होता. हाच अडथळा कायमचा दूर करण्याचा कट अखेर पत्नीने आपल्या मुलासह प्रियकरांच्या मदतीने रचला, मात्र या चौघांनीही कोणताही पुरावा मागे ठेवला नाही. मात्र या घटनेची दबक्या आवाजात गावात चर्चा होती, अखेर पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. पोलिसांनी तपास यंत्रणा चांगलीच गतिमान केली आणि प्रथमता निलाबाई त्याची मुले आणि संशयित बाबाजी करपे यांच्याकडे कसून चौकशी केली असता अखेर या चौघांनी पोलिसांना खूनाची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी निलाबाई करपे प्रियकर बाबाजी करपे आणि दोन मुले यांच्याविरोधात हत्येचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कवठेमहांकाळ पोलिसांनी मृत भारत करपे यांच्या खूनाचा गुन्हा उघडकीस आणला.

No comments