adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मध्यरात्री वनविभागाची धाड; अडावद परिसरात अवैध उत्खननावर कारवाई, JCBसह ट्रॅक्टर जप्त

   मध्यरात्री वनविभागाची धाड; अडावद परिसरात अवैध उत्खननावर कारवाई, JCBसह ट्रॅक्टर जप्त  खलिल तडवी बिडगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अडावद ...

  मध्यरात्री वनविभागाची धाड; अडावद परिसरात अवैध उत्खननावर कारवाई, JCBसह ट्रॅक्टर जप्त 


खलिल तडवी बिडगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अडावद : अडावद वनपरिक्षेत्रात मध्यरात्री वनविभागाने धाड टाकत राखीव वनक्षेत्रातील अवैध उत्खननाचा प्रकार उघडकीस आणला. मा. वनपरिक्षेत्र अधिकारी अडावद यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रेंज स्टाफसह कक्ष क्रमांक 192, वरगव्हान नियतक्षेत्रात कारवाई करण्यात आली. या ठिकाणी JCB (MH 19 EA 6067) यंत्राच्या सहाय्याने राखीव वनक्षेत्रात अनधिकृतरीत्या जमीन उत्खनन करून भूपृष्ठावरील माती (गाळ) ट्रॅक्टर (MH 19 EA 6813) मध्ये भरली जात असल्याचे निदर्शनास आले. तसेच दुसरा ट्रॅक्टर (MH 19 CV 2388) गाळाची खेप खाली करून नवीन खेप घेण्यासाठी सज्ज अवस्थेत उभा होता.

वनविभागाने तात्काळ कारवाई करत संबंधित JCB, दोन ट्रॅक्टर व दोन ट्रॉलीसह मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई मध्यरात्री 2:00 ते 3:00 वाजण्याच्या सुमारास पार पडली. याबाबत वनक्षेत्रपाल अडावद यांनी प्रथम अहवाल क्रमांक 02/2026, दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी नोंदविला आहे.

सदर प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 26(1) D, H, G, 41(2) तसेच महाराष्ट्र वन नियमावली 2014 च्या कलम 31(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धाडसी कारवाई मा. उपवनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव श्री. सौरिष सहाय व मा. सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा श्री. एम. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी अडावद श्री. प्रशांत साबळे, वनपरिमंडळ अधिकारी श्री. योगेश साळुंखे (अतिरिक्त कुड्यापाणी) यांच्यासह वनरक्षक श्री. राकेश निकुभे, श्री. इंद्रसिंग पावरा, श्री. दर्शन सोनवणे, श्री. बाळू राठोड, श्री. गजानन कोईगडे तसेच वनसेवक श्री. हैदर तडवी, श्री. भरत आढाळके, श्री. लतीफ तडवी, श्री. फकुरीद्दीन तडवी, श्री. प्रकाश सपकाळे, श्री. राजू पाटील, श्री. राजेश जोशी, श्री. योगेश सपकाळे व श्री. भिकन तडवी यांनी सहभाग घेतला. वनविभागाच्या या कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.

No comments