जिल्ह्यात प्रथम, राज्यात पदक—करण खेतेची राष्ट्रीय स्तरावर झेप! अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शेगाव शहरातील माऊली कॉले...
जिल्ह्यात प्रथम, राज्यात पदक—करण खेतेची राष्ट्रीय स्तरावर झेप!
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शेगाव शहरातील माऊली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, शेगाव येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (द्वितीय वर्ष)चा विद्यार्थी करण गजानन खेते याने आर्म रेसलिंग स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.
नागपूर येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत करणने उत्कृष्ट प्रदर्शन करत डाव्या हाताने चांदीचे पदक (द्वितीय क्रमांक) मिळवले, तर उजव्या हाताने तिसरा क्रमांक पटकावत कांस्यपदकावर आपले नाव कोरले. या यशामुळे करणची निवड राष्ट्रीय (नॅशनल) स्तरावरील स्पर्धेसाठी झाली असून त्याने माऊली कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे नाव राज्यासह राष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे.
करणने आतापर्यंत आपल्या क्रीडा कारकिर्दीत एकूण 24 पदके व 5 ट्रॉफीज जिंकून भक्कम स्थान निर्माण केले आहे. तसेच पावर लिफ्टिंग स्पर्धेतही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ही आर्म रेसलिंग राज्यस्तरीय स्पर्धा नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातील अनेक खेळाडूंमध्ये झालेल्या या स्पर्धेत करणने उत्कृष्ट खेळ दाखवत द्वितीय क्रमांक पटकावला. करणच्या या यशाबद्दल माऊली कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक तसेच सहविद्यार्थ्यांकडून त्याचे कौतुक होत आहे. तसेच त्याच्या यशामागे आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभल्याचेही सांगितले जात असून आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा देण्यात येत आहेत.

No comments