adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पाचोरा रस्त्यावर ते बांबरुड-भडगाव नदी पुलावर जीवघेणा खड्डा अपघात झाल्यास प्रशासन व ठेकेदार जबाबदार .

 पाचोरा रस्त्यावर ते बांबरुड-भडगाव नदी पुलावर जीवघेणा खड्डा अपघात झाल्यास प्रशासन व ठेकेदार जबाबदार   पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद (संपादक -:-...

 पाचोरा रस्त्यावर ते बांबरुड-भडगाव नदी पुलावर जीवघेणा खड्डा अपघात झाल्यास प्रशासन व ठेकेदार जबाबदार  


पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

बांबरुड ते भडगाव दरम्यानच्या नदीवरील पुलावर मोठा व धोकादायक खड्डा पडल्याची गंभीर बाब समोर आली असून, यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.दुपारच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला असून, संबंधित यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.दररोज या पुलावरून शेकडो वाहनांची ये-जा होत असते. मात्र पुलाच्या मधोमध पडलेला हा खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हा खड्डा लक्षात न आल्यास दुचाकीस्वारां साठी हा मृत्यूचा सापळा ठरू शकतो.स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत सांगितले की, “वेळीच उपाययोजना न झाल्यास मोठी दुर्घटना अटळ आहे.” त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ घटनास्थळी पाहणी करून दुरुस्तीचे काम सुरू करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पदाधिकाऱ्यांनीही प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडली, तर त्यास संपूर्णपणे प्रशासन व संबंधित ठेकेदार जबाबदार राहतील. त्यामुळे आजच संध्याकाळपर्यंत खड्डा बुजवून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी करण्यात येत आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्या या निष्काळजीपणाकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

No comments