adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कृषी केंद्र चालकांच्या राज्यव्यापी आंदोलनास 'स्वराज्य पक्षा'चा पाठिंबा. आंदोलन तीव्र करण्याचा प्रशांत डिक्कर यांचा सरकारला ईशारा.

 कृषी केंद्र चालकांच्या राज्यव्यापी आंदोलनास 'स्वराज्य पक्षा'चा पाठिंबा. आंदोलन तीव्र करण्याचा प्रशांत डिक्कर यांचा सरकारला ईशारा.  ...

 कृषी केंद्र चालकांच्या राज्यव्यापी आंदोलनास 'स्वराज्य पक्षा'चा पाठिंबा.

आंदोलन तीव्र करण्याचा प्रशांत डिक्कर यांचा सरकारला ईशारा. 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

​तेल्हारा:-  राज्यातील कृषी केंद्र चालकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २७ एप्रिल २०२६ पासून राज्यव्यापी बेमुदत बंद पुकारला आहे. कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या या न्याय्य लढ्याला 'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष (शेतकरी आघाडी)' कडून जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी यासंदर्भात राज्याचे कृषीमंत्री यांना पत्र लिहून आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा दिला आहे.

​कृषी केंद्र चालकांनी प्रामुख्याने खते पुरवठ्यातील सक्तीचे 'लिंकिंग' थांबवणे, जाचक अटी शिथिल करणे आणि सीलबंद पाकिटांच्या बाबतीत विक्रेत्यांना आरोपी न ठरवता साक्षीदार मानणे, या मागण्यांसाठी हे पाऊल उचलले आहे. प्रशांत डिक्कर यांनी पत्रात नमूद केले की, "कृषी केंद्र चालक हा शेतकरी आणि व्यवस्था यामधील महत्त्वाचा दुवा आहे. त्यांच्यावर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही.

​महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने स्पष्ट केले आहे की, जर सरकारने या विषयावर तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. खरीप हंगाम तोंडावर असताना कृषी केंद्रे बंद राहिल्यास शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होऊ शकते. त्यामुळे सरकारने तातडीने मध्यस्थी करून यावर तोडगा काढावा, जेणेकरून बळीराजाला नाहक त्रास सहन करावा लागणार नाही.

​"विक्रेत्यांच्या मागण्या रास्त आहेत. सरकारने तातडीने यावर निर्णय घ्यावा, अन्यथा महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या आंदोलनात पूर्ण ताकदीनिशी उतरेल.असा ईशारा प्रशांत डिक्कर यांनी कृषीमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

No comments