adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सांगलीत पोलिसांकडून गावठी पिस्तुल जिवंत काडतुसे अन् चोरीच्या मोटरसायकल ताब्यात; २ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; चिंचणी-वांगी पोलीसांची दमदार कामगिरी!

 सांगलीत पोलिसांकडून गावठी पिस्तुल जिवंत काडतुसे अन् चोरीच्या मोटरसायकल ताब्यात; २ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; चिंचणी-वांगी पोलीसांची ...

 सांगलीत पोलिसांकडून गावठी पिस्तुल जिवंत काडतुसे अन् चोरीच्या मोटरसायकल ताब्यात; २ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; चिंचणी-वांगी पोलीसांची दमदार कामगिरी! 


 (सांगली जिल्हा ) रणजित मस्के प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

कडेगांव तालुक्यांतील चिंचणी वांगी पोलिसांनी दमदार कारवाई करत यामध्ये 3 देशी बनावटीचे पिस्तूल 2 जिवंत काडतुसे असे आणि 4 मोटरसायकली हस्तगत करून तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा बंदोबस्त असताना चिंचणी वांगी पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चिंचणी वांगी पोलीस ठाण्यातील पोलिसांना सूचना दिल्या आस्था पोलिसांनी सापळा लावून तिघांना प्रथमता ताब्यात घेवुन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातील पिस्टोल जिवंत काडतुसे आणि  चोरीच्या 4 मोटरसायकल आढळून आल्या. तपासादरम्यान पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपींनी सोनकिरे शेणोली कराड मणेराजुरी परिसरांतील दुचाकी चोरीची कबुली दिली यामध्ये जवळपास 2 लाख 37 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात चिंचणी वांगी पोलिसांना यश आले आहे. आरोपी नामे प्रथमेश हनुमंत जावडे तन्मय विश्वास पाटील मनोज राजेंद्र खांडेकर अशी त्यांची नावे आहेत. सदरची कामगिरीही जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार धनाजी शिंदे विनायक सावळगे हरिदास पवार विक्रम पवार योगेश माळी सायबर पोलीस ठाणे कॅप्टन गंडवाडे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. चिंचणी वांगी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे.

No comments