adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पदभार स्वीकारताच नवनियुक्त आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय! आधी पर्याय, मग बुलडोजर; सांगलीत मोठ्या कारवाईचे संकेत!

 पदभार स्वीकारताच नवनियुक्त आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय! आधी पर्याय, मग बुलडोजर; सांगलीत मोठ्या कारवाईचे संकेत!   (सांगली जिल्हा) रणजित मस्के...

 पदभार स्वीकारताच नवनियुक्त आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय! आधी पर्याय, मग बुलडोजर; सांगलीत मोठ्या कारवाईचे संकेत!  


(सांगली जिल्हा) रणजित मस्के प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सांगली मिरज आणि कुपवाड शहरांत सुरू असलेल्या अतिक्रमाविरोधी कारवाई यापुढेही कायम राहणार आहे. खोकीधारकांवरील कारवाई आधीं त्यांना पर्याय दिला जाईल, त्यानंतर बुलडोजर चालवला जाईल, स्वच्छ सुंदर सांगलीसाठी मी नेहमीच कटीबद्ध असेल अशी ठाम भूमिका महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त संजीता महापात्र यांनी घेतला आहे. यावेळी नूतन आयुक्तांनी मला कामात दिरंगाई चालणार नाही असा संदेश महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना देखील दिला आहे. रस्ते,पाणी, शिक्षण आरोग्य या मूलभूत सुविधांवर कायम भर राहील सांगलीला स्वच्छ सुंदर बनवू सत्यम गांधी यांनी चालवलेली अतिक्रमांवरील कारवाई सुरूच ठेवून त्यानंतरही तिथेच अतिक्रमण झाले असेल, तर व्हिडिओ पाहून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, एखाद्या परवानाधारक खोक्यांत अवैध प्रकार चालत असेल, तर त्याचे पुरावे असल्यास थेट कारवाई करण्यात येईल त्यासाठी कुणाचीही गय केली जाणार नाही. अतिक्रमांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी पूर्णवेळ पथक स्थापन करण्यात येईल, यात नागरिकांची देखील भूमिका महत्त्वाची राहणार आहे. सांगली मिरज आणि कुपवाड ही तिन्ही शहरे त्यांच्या परीने हळूहळू विकसित झाली आहेत. त्यामुळे सीमांकनात गोंधळ आहे. विकास आराखड्याचा आधार घेवुन हा प्रश्न सोडवला जाईल, शहरांतील वाहनतळाचा प्रश्न गंभीर आहे. बहुमजली वाहनतळ हा चांगला पर्याय आहे. त्यासाठी योग्य जागा शोधल्या जातील, पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे एकाच ठिकाणचा कार्यभार असल्यामुळे तोही कमी करण्यात येईल, सांगली मिरज आणि कुपवाड प्रशासनाच्या माध्यमांतून शहरातील विकास कामांना आणि सांगली मिरज कुपवाड ही शहरे आणखीन स्वच्छ बनवण्यावर कायम भर राहील, असेही नव्या आयुक्त संजीता महापात्र म्हणाल्या आहेत.

No comments