adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरमध्ये धाडसी चोरी; १०० गॅस सिलिंडर लंपास, परिसरात खळबळ

  फैजपूरमध्ये धाडसी चोरी; १०० गॅस सिलिंडर लंपास, परिसरात खळबळ  फाईल फोटो   इदू पिंजारी, फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर : शहराजवळ...

  फैजपूरमध्ये धाडसी चोरी; १०० गॅस सिलिंडर लंपास, परिसरात खळबळ 

फाईल फोटो 

 इदू पिंजारी, फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर : शहराजवळील पिंपरुड रोड परिसरात असलेल्या ‘श्रीधर गॅस एजन्सी’च्या गोदामात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाड टाकत तब्बल १०० भरलेले गॅस सिलिंडर चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी सकाळी हा प्रकार समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी एजन्सीचे कर्मचारी व संचालकांनी गोदाम बंद केले होते. त्या वेळी गोदामात एकूण २०९ भरलेले गॅस सिलिंडर साठवलेले होते. मात्र शनिवारी सकाळी कर्मचारी गोदाम उघडण्यासाठी आले असता मुख्य गेटचे कुलूप तुटलेले आढळले. आत पाहणी केल्यानंतर १०० सिलिंडर चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.

चोरी गेलेल्या प्रत्येक सिलिंडरची किंमत सुमारे ३,११८ रुपये असून एकूण सुमारे ३ लाख ११ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चोरट्यांनी मोठ्या वाहनाचा वापर करून नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, देशभरात गॅस टंचाईचे वातावरण असताना या घटनेमुळे परिसरात सिलिंडर तुटवडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकरणी गोदाम मालक ललित रघुनाथ राणे यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.  या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments