adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

​शहर विधानसभा मतदार संघा बाहेरील 'ती' बोगस नावे वगळा उबाठा पक्षाचे शहराध्यक्ष किरण काळे यांची मागणी

 ​शहर विधानसभा मतदार संघा बाहेरील 'ती' बोगस नावे वगळा उबाठा पक्षाचे शहराध्यक्ष किरण काळे यांची मागणी  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक ...

 ​शहर विधानसभा मतदार संघा बाहेरील 'ती' बोगस नावे वगळा उबाठा पक्षाचे शहराध्यक्ष किरण काळे यांची मागणी 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

​अहिल्यानगर :-शहर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत मागील निवडणुकीत राजकीय हस्तक्षेपातून घुसखोर करण्यात आलेली बाहेरील मतदारसंघातील हजारो नावे तात्काळ वगळण्यात यावीत, अशी आक्रमक मागणी किरण काळे यांनी केली आहे.मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेत (SIR) होत असलेल्या गंभीर अनियमिततांबाबत काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले.

​राजकीय हस्तक्षेपातून नावांची घुसखोरी यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, "२०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी श्रीगोंदा-नगर तसेच राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघातील हजारो नावांचा समावेश शहराच्या मतदार यादीत करण्यात आला होता. निवडणूक यंत्रणा हाताशी धरून हा प्रकार घडला असून, त्यावेळी हरकत घेऊनही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. आता सुरू असलेल्या मोहिमेत तरी ही बोगस नावे काढून यादी शुद्ध करावी."​प्रशासकीय कामात गंभीर त्रुटी मतदार यादी अद्ययावत करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या 'एसआयआर' अभियानावरही काळे यांनी ताशेरे ओढले. अनेक ठिकाणी कर्मचारी प्रत्यक्ष घरी न जाताच पडताळणी पूर्ण झाल्याचे दाखवत आहेत. डेटा एन्ट्रीमध्ये नाव, वय आणि पत्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुका होत असून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला आहे. तसेच स्थलांतरित कामगार आणि भाडेकरूंच्या नोंदीमध्ये मोठी विसंगती दिसून येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

​मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित यावेळी किरण काळे यांच्यासह संजय झिंजे, मनोज गुंदेचा, विलास उबाळे, अनिस चुडीवाला, रावजी नांगरे, पै. दीपक भोसले, राम वाणी, राम झिने, चंद्रकांत उजागरे, संजय कांबळे, राम धोत्रे, उषा भगत, शारदा वाघमारे, मीना रणशूर, विकास भिंगारदिवे, किशोर कोतकर, शंकर आव्हाड, विनोद शिरसाट, माजी नगरसेवक फैयाज शेख, हाफिज सय्यद, धनंजय देशमुख, गणेश आपरे, आकाश आल्हाट यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने या त्रुटींची तात्काळ दखल घेऊन पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने मतदार यादी अद्ययावत न केल्यास आगामी काळात तीव्र भूमिका घेण्याचे संकेत शिष्टमंडळाने दिले आहेत.

No comments